२० ब्लड कॅन्सर रुग्णांवर कोरोना महामारीच्या काळात यशस्वी उपचार. एचसीजी मानवता हेमॅटोलॉजी टीमचे यश

Jul 16, 2020

साधारणपणे १००००० जनसंख्या मागे १ ते २ रुग्ण हे रक्ताच्या कर्करोगाचे (एक्यूट ल्यूकेमिया) चे सापडतात. ॲक्युट ल्युकेमिया चे प्रमुख्याने ALL व AML हे दोन प्रकार आहेत. AML हा प्रौढांमध्ये तर ALL हा लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा संपूर्ण जग कोरोनाच्या आव्हानाला तोंड देत असताना, त्याच वेळी लुकेमियाच्या रुग्णांना कोविड संसर्गाचा धोका अधिक असल्याने तसेच लॉकडाऊन मुळे प्रचंड प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे कोविड-१९ संसर्गाची जोखीम अधिक असते. ब्लड कॅन्सर हा खरंतर स्टेम सेल्स पासून उद्भवणारा आजार आहे. स्टेम सेल्सपासूनच आपल्या रक्तपेशींची उत्पत्ती होते. मूळ रक्त तयार करणाऱ्या पेशी मध्ये जेव्हा जनुकीय बिघाड होतो त्यावेळी त्यापासून तयार होणाऱ्या रक्तपेशी या अकार्यक्षम असतात.या पेशी शरीरावर होणाऱ्या संक्रमना बरोबर लढण्यास अपात्र ठरतात. ज्यामुळे ब्लड कॅन्सर च्या रुग्णांमध्ये विविध संसर्गाचा धोका अधिकच वाढतो. रक्ताच्या कर्करोगाचे निदान हे फ्लोसायटोमेट्री (flow cytometry) नावाच्या विशेष तंत्राने केली जाते. या चाचणी करिता बहुतांश वेळी मुंबई-पुण्याकडे धाव घ्यावी लागते. रिपोर्ट येण्यास पाच ते सहा दिवस लागतात. पण फ्लोसायटोमेट्री चाचणी एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर नाशिक मध्ये उपलब्ध असल्याने केवळ सहा तासांत निदान करीत पेशंटचे त्वरित उपचार योग्यरीत्या सुरू होतात.
ब्लड कॅन्सरची उपचार पद्धती ही तीन टप्प्यांमध्ये विभागली आहे १) इंडक्शन (Induction) २) कन्सोलिडेशन ( consolidation) ३) मेन्टेनन्स (maintenance). यामधील इंडक्शन चा टप्पा अधिक महत्वाचा असतो या काळात रुग्णांच्या पांढऱ्या पेशी खूपच कमी होतात व त्यांना विविध संसर्ग (जसे की जिवाणू ,विषाणू आणि फंगस) होण्याची जोखीम वाढते.
या महामारीच्या काळात अशा रुग्णांची ट्रीटमेंट करणे अत्यंत गुंतागुंतीचे आहे. यातच भर म्हणून ह्या रुग्णांना वारंवार रक्त व प्लेटलेट चढवाव्या लागतात. त्यामुळे ह्या रोगाची चिकित्सा करणाऱ्या डॉक्टरांचे कार्य अधिक जिकरीचे बनते.या कठीण प्रसंगात एससीजी मानवता रक्तविकार विभागाने २० हून अधिक ब्लड कॅन्सर (Acute leukemia ALL & AML) च्या रुग्णांचे यशस्वीपणे उपचार केले. कर्करोगाची योग्य ट्रीटमेंट करून रुग्णांचा संसर्गापासून बचाव करणे हे डॉक्टरांसमोर सर्वात मोठे आव्हान होते.
साधारणपणे एक्यूट ल्यूकेमिया च्या उपचारादरम्यान ३०% रुग्ण दगावण्याचा धोका असतो पण जर योग्य उपचार निष्णात तज्ञ व सुविधा असल्यास उपचार शक्य आहेत.
त्यातही कोरोना सारख्या महामारीमुळे रुग्ण दगावण्याचा धोका अत्यंत जास्त प्रमाणात वाढतो. म्हणूनच निष्णात डॉक्टरांची टीम एकाच छताखाली असणे फार महत्वाचे.
सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय गाईडलाईन्स पाळत डॉ. गिरीश बदरखे व डॉ. निलेश वासेकर यांच्यासोबत या काळात संपूर्ण टीमने या रोगाला न जुमानता सामाजिक व व न्यायिक जबाबदारीने उपचार केले.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News