नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक आणि जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत निफाड येथे असलेल्या गोल्फ असोसिएशन ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रिव्हर साईड गोल्फ कोर्स यांच्या सहकार्याने येथील गोल्फच्या मैदानावर महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आणि क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनातून आणि नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा गोल्फ प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे. गोल्फ हा खेळ खेळणे सर्वांना आवडते. परंतु त्यासाठी तश्या प्रकारच्या सुविधा सर्व ठिकाणी उपलब्ध नसतात त्यामुळे निफाड येथे असलेल्या रिव्हर साईड गोल्फ कोर्स येथे हे गोल्फचे प्रशिक्षण केंद्र सुरु करणे शक्य झाले आहे. यामुळे नाशिकच्या ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना फार चांगली संधी प्राप्त झाली आहे. .सादर ठिकाणी गोल्फचे प्रशिक्षण घेण्याकरिता विविध शाळा- महाविद्यालयातील विदयार्थी येत असतात. या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र योजनेअंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या कडून गोल्फचे क्रीडा साहित्य आज दिनांक उपलब्ध करुवून देण्यात आले आहे. यामध्ये चार कीट बॅग, ट्रॉली, गोल्फचे ३०० बॉल्स. क्लब आदी साहित्याचा समावेश आहे. या प्रसंगी नाशिकचे जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, रिव्हर साईड गोल्फ कोर्सचे संचालक तथा गोल्फ असोसिएशन ऑफ नाशिकचे अध्यक्ष विंग कमांडर प्रदीप बागमार, सचिव नितीन हिंगमिरे, उपाध्यक्ष राजीव देशपांडे, गोल्फचे खेळाडू अनिल घाणेकर, अपूर्व भांडगे, धवल पटेल, विवेक कोठावदे, अनंत जोशी, कु. ईरा जोशी, खंडू कोतकर, आदी उपस्थित होते. गोल्फसाठी अश्या प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांनी सांगितले की गोल्फ सारखे खेळ सर्व सामान्य मुलांनाही खेळता यावे. आणि यामधून महाराष्ट्राला चांगले गोल्फचे खेळाडू मिळावे हा यामागचा उद्देश आहे असे सांगितले.. गोल्फ या खेळाच्या पुढील वाटचालीसाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाचे फार मोलाचे पाऊल आहे. शासनाचा उपक्रमामुळे गोल्फ खेळात चांगले खेळाडू तयार करण्यासाठी आमच्या वतीने जोमाने प्रयत्न केले जातील.असा विश्वास यावेळी विंग कमांडर यांनी व्यक्त केला.
नाशिकमध्ये राज्यस्तरीय जुदो लीग स्पर्धेचे आयोजन
लीग स्पर्धेमधून संघभावना जोपासण्यास मदत - रत्नाकर पटवर्धन, सचिव नाशिक जिल्हा ज्यूदो असोसिएशन...






