क्रीडा संघटक रत्नाकर पटवर्धन आणि बी. डी. रॉय यांचा क्रीडा दिनानानिमित्त सन्मान

Aug 29, 2020

श्री यशवंत व्यायाम शाळा, सवंगडी संस्था, क्रीडा साधना, नाशिक  आणि कॉ. नानासाहेब मालुसरे संस्था  यांच्या वतीने दरवर्षी क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान असलेल्या मान्यवरांचा गेल्या १० वर्षांपासून  सन्मान करण्यात येतो. या ११ व्या वर्षी नाशिकच्या, महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय स्तरावर जुदो या खेळात मोलाचे योगदान असलेले मा. रत्नाकर पटवर्धन यांचा आणि फुटबॉलचे प्रशिक्षक म्हणून गेले तीन तप कार्यरत असलेले बी. डी. रॉय यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दिपक पाटील, नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवीन्द्र नाईक, या कार्यक्रमाचे आयोजक टेबल टेनिस प्रशिक्षक शशांक वझे, आनंद खरे, रवींद्र मेतकर, अविनाश ढोली, नितीन हिंगमिरे, अविनाश खैरनार . संजय मालुसरे  आदींच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि  आणि सन्मानचिन्ह देऊन या दोन मान्यवरांना सन्मानित  आले. .
रत्नाकर पटवर्धन हे गेल्या ४५ वर्षांपासून ज्युदो या खेळासाठी वेगवेगळ्या स्तरावर कार्यरत आहेत. यावेळी सत्काराला उत्तर देतांना रत्नाकर पटवर्धन यांनी सांगितले की आपल्या भारतातच खेळाविषयी भरपूर ज्ञान आणि माहिती उपलब्ध आहे. आपण परदेशात खेळाच्या आणि व्यायामाच्या टेक्निक्स  शिकायला जातो अशी आपली मानसिकता झाली  आहे.  परंतु आपल्या भारतातच खेळाविषयी भरपूर ज्ञान आणि माहिती उपलब्ध आहे टेक्निक्स आहे. याचा फायदा आपल्या आत्ताच्या खेळाडूंनी करून घेतला पाहिजे असे सांगितले आणि अगदी स्वातंत्र्यापूर्वीपासूनचे महत्वाचे दाखले दिले,. जिल्हा क्रीडाधिकारी यांनी सांगितले की पटवर्धन सरांसारख्या जाणकारांकडून आपण माहिती आणि ज्ञान घेऊन क्रीडा क्षेत्रात प्रगती केली पाहिजे असे सांगितले. 
दिपक पाटील यांनी यशवंत व्यायाम शाळेच्या माध्यमातून जुन्या – नव्याचा मिलाप करून क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याचा आमचा मानस आहे असे सांगितले. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद खरे यांनी केले, सत्कारार्थीचा परिचय रवींद्र मेटकरी यांनी करून दिला,  तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे संयोजन प्रमुख शशांक वझे यांनी केले.  
 
 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News