नाशिक : नाशिक शहरासाठी पाटबंधारे विभागाच्या गंगापुर धरण समुह,दारणा धरण व मुकणे धरणातुन रॉ-वॉटर पंपीग करुन मनपाच्या सात जलशुध्दीकरण केंद्रामार्फत दैनंदिन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणेत येतो.आजची असलेली धरणाची पातळी ही मागील काही वर्षामध्ये न्युनतम पातळीवर आलेली आहे. सदय:स्थितीत अदयाप पाऊस अत्यल्प असल्याने तसेच आगामी काळात पाऊस झाल्यानंतर धरणांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी येणेसाठी लागणारा कालावधी लक्षात घेता सध्याच्या दैनंदिन पाणी वापराचे फेरनियोजन करणेत येत असुन त्यानुसार गंगापूर धरण समुहातील उपलब्ध पाणी पुरवठा यानुसार काही प्रमाणात कपात करणे आवश्यक आहे.त्यानुसार किमान उपलब्ध पाणी साठा हा पिण्यासाठी पुरेल यासाठी नाशिक शहरात रविवार दिनांक 30/06/2019 पासून शहरात एकवेळ पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे. तसेच दि. 02/07/2019 तारखेपर्यंत धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे संपुर्ण नाशिक शहरात दि. 04/07/2019 पासुन दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहिणार आहे.याबाबतचे मनपाने आपल्या परिपत्रक व जाहिर निविदनाद्वारे सांगितले आहे.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





