- नाशिक : प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सोमवार 08 जुलै, 2019 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड, नाशिक येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सुरेखा पाटील, महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपआयुक्त यांनी दिली आहे.
सदर महिला लोकशाही दिनात राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्यानुसार समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे रक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, यासाठी महिलांच्या तक्रारी व अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून विभागीय स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तरी ज्या समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी तालुका व जिल्हास्तरावर अर्ज केले असतील व त्यांच्या समस्येचे निराकरण झाले नसेल अशा महिलांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या टोकननंबरसह आपले अर्ज विभागीय महिला लोकशाही दिनात सादर करण्याचे आवाहनही श्रीमती पाटील यांनी केले आहे.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





