वीरमाता, वीरनारी आणि खेळाडूंच्या मतांचा सन्मान करणे कौतुकास्पद – म.न.पा. आयुक्त कैलास जाधव

Jan 12, 2021

 

नाशिक  : कालिका मंदिर देवी ट्रस्ट, क्रीडा साधना संस्था आणि डी.एस.फाउंडेशन यांच्या वतीने आज दिनांक १२ जानेवारी, २०२१ रोजी   राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त वीरमाता, वीरपत्नी/ वीरनारी  आणि शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या मातांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये  १६ वीरमाता आणि वीरनारी आणि २८ छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या मातांचा समावेश होता. 
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त मा. श्री  कैलास जाधव, जिल्हा क्रीडा अधिकार रविंद्र नाईक, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक नानासाहेब महाले, कालिका देवी मंदिर ट्रस्टचे खजिनदार सुभाष तळाजिया क्रीडा संघटक अशोक दुधारे  यांच्या हस्ते या वीरमाता, वीरनारी आणि खेळाडूच्या मातांना शाल श्रीफळ सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. आज  दिनांक १२ जानेवारी रोजी दुपारी ०४. ०० वाजता कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या  हॉलमध्ये संपन्न झालेल्या या या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे नाशिक  श्री कैलास जाधव यांनी सांगितले की जिजाऊंनी ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले आणि महाराजांनी स्वराजाची मुहूर्तमेढ रचली त्याचप्रमाणे भारतासाठी लढणाऱ्या शाहिद जवानांच्या वीर माता आणि वीरनारी / वीरपत्नी यांचेही योगदान मोलाचे आहे. तसेच शिव छत्रपती पुरस्कार मिळविणाऱ्या खेळाडूंच्या प्रगतीमध्ये  त्यांच्या मातांचा मोलाचा वाटा आहे. अश्या कर्तृत्ववान मातांचा सन्मान करणे हे फार चांगले कार्य आहे. असे सांगून यासाठी आयोजकांचे कौतुक केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक नानासाहेब महाले, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  
यावेळी विजया दुधारे यांनी राजमाता जिजाऊ यांच्यावर रचलेली कविता सादर केली. या कार्यक्रमाचे प्रास्तविक आनंद खरे यांनी केले तर सूत्रसंचालन अविनाश खैरनार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन हिंगमिरे, अविनाश ढोली, शशांक वझे, विक्रम दुधारे आदिंनी परीश्रम घेतले. 
 
खालील महिलांचा  झाला सत्कार :-
) वीरमाता आणि  वीरपत्नी :- जिजाबाई धोंगडे, मिनाक्षी कुलकर्णी, वैशाली वायदंडे, लीलाबाई  जाधव, कृष्णाबाई बोडके ,बाळूबाई सोनावणे, बब्बुबाई ढाकणे,रेखा खैरनार,कल्पना रौंदळ, भारती पगार, सुषमा मोरे, रुपाली बच्छाव, कमल लहाने, सुवर्णा निकम, भरती चौधरी, यशोदा गोसावी, आशा सोनजे, अर्चना निकम, निर्णयाला ठाकरे, भागबाई दराडे, 
२) छत्रपती पुरस्कार खेळाडू माता :-  जिजाबाई धोंगडे, मिनाक्षी कुलकर्णी, वैशाली वायदंडे, लीलाबाई जाधव, विजया दुधारे, विमल तांबे, आशाबाई कडाळे, देविका महाजन, मीना आथरे, विजया दुधारे, हिराबाई घोलप, उज्वला जाधव, संगीता पोहरे, चंपावती देशमुख, जिजाबाई पाटील, भारती जाधव, अशा मुर्तडक 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News