इटलीत आयोजित जागतिक आंतरविद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी रोशनी मुर्तडक, ज्योती सुतार, आणि तुषार आहेर इटलीला रवाना

Jul 5, 2019

महाराष्ट्राचे  खेळाडू चांगली कामगिरी करतील – डॉ. उदय डोंगरे, संघ व्यवस्थापक

नाशिक  :- दिनांक ३ जुलै ते १० जुलै दरम्यान  इटली येथे जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धेत समावेश असलेल्या  तलवारबाजी खेळाच्या स्पर्धा दिनांक ६ ते ९ जुलै रोजी होणार आहेत. या स्पर्धेत नाशिकची रोशनी मुर्तडक. कोल्हापूरची  ज्योती सुतार  आणि औरंगाबादचा तुषार आहेर  या महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंचा समावेश झाला आहे, तर संघाचे व्यवस्थापक म्हणून औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे  क्रीडा संचालक  डॉ. उदय डोंगयांची संघ व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली आहे. या स्पर्धेत  रोशनी मुर्तडक ही ईपी या प्रकारात स्पर्धा करणार आहे,  तर ज्योती सुतार आणि तुषार आहेर हे दोन खेळाडू सॅबर या प्रकारात स्पर्धा करतील. या स्पर्धेच्या तयारीसाठी अमृतसर, पंजाब येथे या खेळाडूंचे सराव शिबीर आयोजित करण्यात आले होते.  हे खेळाडू दिल्ली येथून दिनांक १ जुलै रोजी  जागतिक अंतरविद्यापीठीय स्पर्धेसाठी  इटली येथे रवाना झाले. या तीनही खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या आधारे अखिल  भारतीय विद्यापीठीय स्पर्धेत चांगली कामगिरी करून पदकांची कमाई केली आहे. तसेच पतियाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या सराव शिबीरामध्ये प्रशिक्षकानी खेळाडूंकडून चांगला सराव करून घेतला आहे. त्यामुळे हे खेळाडू  इटलीतील  या जागतिक आंतरविद्यापीठ तलवारबाजी  स्पर्धेत चांगली कामगिरी करतील असा विश्वास संघासोबत असलेले संघव्यवस्थापक डॉ. उदय डोंगरे  यांनी व्यक्त केला. या तीनही खेळाडूंचे तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक दुधारे, कार्याध्यक्ष प्रकाश काटोळे, क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक आनंद खरे. राजू शिंदे, दिलीप घोडके, शेषनारायण लोढे, राजकुमार सोमवंशी आदिंनी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.  

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News