नाशिक,: दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षा उपाय म्हणुन नाशिक ग्रामीण जिल्हा अंतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील जमीनीचे मालक, भाडेकरु मंदीर, गुरुद्वारा, चर्च, मस्जीद, धर्मशाळा, हॉटेल, लॉजेस इत्यादींचे विश्वस्त , संचालक मंडळ , चालक मालक जमीनी, घर खरेदी विक्री करणारे व्यावसायीक, जुने व नवीन चारचाकी, दुचाकी वाहने खरेदी -विक्री करणारे व्यावसायिक, फेरीवाले, सिमकार्ड विक्रेते, सायबर कॅफे, भंगार खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक, औद्योगिक वसाहतींना मनुष्यबळ पुरविणाऱ्या एजन्सी, ज्वालाग्राही पदार्थांचे साठेधारक, शस्त्र व दारुगोळा/स्फोटक परवानाधारक इत्यादींना मालमत्ता बाबतचे व्यवहार विवरणाची माहिती लेखी स्वरुपात पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक आहे. सदरचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता1973 चे कलम 144 (2) नुसार अपर जिल्हादंडाधिकारी रामदास खेडकर यांनी दिले आहेत. हा आदेश 23 ऑगस्ट 2019 पर्यंत अंमलात राहील. आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 प्रमाणे कार्यवाही केली जाईल.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





