नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्याअध्यक्षपदी दत्ता पाटील तर सरचिटणीसपदी राजू शिंदे

Aug 22, 2021

नाशिक  :- नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशनची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेमध्ये सन २०२१ ते २०२५ या पुढील चार वर्षाकरिता नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये नाशिक  जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता पाटील यांची तर सरचिटणीस पदी राजू शिंदे यांची निवड करण्यात आली. .कार्याध्यक्षपदी उदय खरे,  उपाध्यक्षपदी सी. डी. रोटे आणि ज्ञानेश्वर निगळ यांची,  खजिनदारपदी दिपक निकम यांची निवड करण्यात आली. सहसचिव म्हणून विक्रम दुधारे आणि आनंद चकोर यांची निवड करण्यात आली आहे. तर  कार्यकारी सदस्य म्हणून अशोक दुधारे, जय शर्मा, मनीषा काठे, आनंद खरे, राहुल फडोळ आणि वैभव विसपुते यांची निवड करण्यात आली आहे. दत्ता पाटील हे माजी नगरसेवक आणि कालिका मंदिर ट्रस्टचे संचालक असून तलवारबाजी बरोबरच अनेक खेळासाठी त्यांचे भरघोस योगदान राहिलेले आहे. या निवड प्रक्रियेनंतर त्यांनी सांगितले की नाशिकमध्ये तालवारबाजीचे चांगले वातावरण आहे. नाशिकच्या अनेक खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पदके मिळविलेली आहेत. तर नाशिकच्या काही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्येही भारताचे प्रतिनिधीत्व करून चांगली कामगिरी केलेली आहे. परंतु गेल्या वर्ष- दीड वर्षांमध्ये खेळाडूंना संधी मिळालेली नाही. त्यामुळे पुढील काळात नाशिकच्या जास्तीत जास्त खेळाडूंना संधी मिळण्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातील असे सांगितले. राजू शिंदे आणि उदय खरे यांनी सांगितले की येत्या दोन – तीन  महिन्यात प्रत्येक तालुक्यात तलवारबाजीचे प्रशिक्षण केंद्र सुरु केले जाईल आणि नाशिक जिल्ह्याच्या जास्तीत जास्त खेळाडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल,  प्रामुख्याने लहान गटाच्या खेळाडूवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे यासाठी परीश्रम घेतले जातील असेही त्यांनी सांगितले.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे  : –
अध्यक्ष – दत्ता पाटील
कार्याध्यक्ष – उदय खरे
उपाध्यक्ष –  ज्ञानेश्वर निगळ,  सी. डी. रोटे.
सरचिटणीस – राजू शिंदे
सह चिटणीस –  विक्रम दुधारे, आनंद चकोर
खजिनदार – दिपक निकम
कार्यकारी सदस्य – अशोक दुधारे, जय शर्मा, मनीषा काठे, आनंद खरे, राहुल फडोळ, वैभव विसपुते

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News