राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन

Aug 26, 2021

 क्रीडा संघटक आणि टेबल टेनिस प्रशिक्षक शशांक वझे यांच्या वतीने आणि यशवंत व्यायाम शाळा यांच्या सहकार्याने  दरवर्षी  २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जेष्ठ क्रीडा प्रशिक्षकाना सन्मानित करण्यात येते.हे या उपक्रमाचे १२ वे वर्ष आहे.
या वर्षी जेष्ठ क्रीडा संघटक क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संचालक रतिलाल श्रीमलं मेहेर तथा  बाबा मेहेर आणि अण्णा दगा सोनावणे तथा अप्पा सोनवणे यांच्या गेल्या ५० वर्षाच्या क्रीडा क्षेत्रासाठीच्या योगदानाबद्दल या दोन क्रीडा संघटकांना सन्मानित करण्यात येणार आहे.
सादर कार्यक्रम यशवंत व्यायाम शाळा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त,  क्रीडा संघटक आनंद खरे यांची उपस्थिती असणार आहे. सध्या कोवीडच्या  प्रादुर्भावाचा काळ असल्यामुळे  शासनाच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार  सर्व बाबींची पूर्तता करून कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी या कार्यक्रमाला केवळ २९ निमंत्रितांची उपस्थिती असणार आहे.
तरीही नाशिकमधील आणि महाराष्ट्रातील सर्व क्रीडा प्रेमींना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा यांसाठी या कार्यक्रमाचे दृकश्राव्य माध्यमातून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. .
तरी  जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक शशांक वझे यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News