नाशिक : रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या गव्हर्नर पदी प्रथमच कसमादेच्या ग्रामीण भागातून मालेगाव येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रोटेरीयन राजेंद्र भामरे यांची गव्हर्नरपदी निवड झाली आहे. त्यांचा पदग्रहण सभारंभ होणार असून त्यांना शपथ देण्याकरीता रोटरी इंटरनॅशनल चे डायरेक्टर रोटेरीअन कमल संघवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोबतच नाशिक ते नागपूर डिस्ट्रिक्ट असलेला हा ‘डिस्ट्रिक्ट३०३०’चे शंभर क्लब पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा पदग्रहण सभारंभ रविवारी दि.७ जुलै रोजी सकाळी १० वाजता नाशिक शहरातील गुप्ता लॉन्स,सोमेश्वर मंदिर गंगापूर रोड येथे होत आहे.मालेगाव येथील मुळचे रहिवासी असलेले रोटेरीयन राजेंद्र भामरे यांची निवड तीन वर्षापूर्वी साल २०१९ ते साल २०२० साठी करण्यात आली होती. रोटरीच्या इतिहासात प्रथमच ग्रामीण भाग व त्यातही पोलिओसाठी अजूनही संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मालेगाव मधून रो. भामरे यांची गव्हर्नरपदी निवड झाली आहे. रो.भामरे यांचा कार्यकाल हा १ जुलै २०१९ ते ३० जून २०२० पर्यंत असणार आहे.रोटरीच्या त्यांच्या पदग्रहण व शपथविधी कार्यक्रमासाठी रोटरीचे संपूर्ण भारतातून मान्यवरांची हजेरी लागणार आहे.
रोटेरीयन राजेंद्र भामरे यांचा परीचय :राजेंद्र भामरे सिव्हील इंजिनीअर असून, यशस्वी बांधकाम व्यवसायिक आहेत. या आगोदर त्यांनी अनेक संस्थाचे अध्यक्षपद भूषवले आहे. नाशिक मध्ये त्यातही ग्रामीण भागात रोटरी स्थापने नंतर ६० वर्षानंतर प्रथमच ग्रामीण भागातून त्यांच्या रूपाने गव्हर्नर म्हणून निवड झाली आहे.रोटरी सारख्या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेमध्ये डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून नियुक्त झालेले राजेंद्र भामरे यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. पोलिओ, टी.बी, हृदय शस्रक्रिया आणि तसेच शिक्षण, पर्यावरणाचा समतोल,जलसंधारण यासारख्या सामाजिक कार्यात रोटरीच्या माध्यमातून त्यांनी आपले कार्य उभे केले आहे. त्यांनी स्वतः ५५ वेळा रक्तदान करत रक्तदाता म्हणून नाव मिळवले आहे. राजेंद्र भामरे यांची डिस्ट्रिक्ट गव्हर्नर चे ट्रेंनिंग हे अमेरिकेत सनदीयागो येथे झाले,आपल्या अमेरिकेतील एक महिन्याच्या वास्तव्यात त्यांनी अनेक शहरांना भेटी देऊन तेथील स्थानिक क्लबला पार्टनर करून डिस्ट्रिक्ट 3030 मध्ये जलसंधारण,आरोग्य,शिक्षण यामध्ये कार्य करण्यासाठी प्रवृत्त केले.मूळचे बागलाण चे भूमीपुत्र असलेले राजेंद्र भामरे हे अतिशय मनमिळवू आणि मितभाषी म्हणून ओळखले जातात. त्यांना त्यांच्या रोटरी प्रवासासाठी संपूर्ण डिस्ट्रिक्ट मधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





