नाशिक येथे दिनांक २ आणि ३ सप्टेंबर रोजी वरिष्ठ आणि यूथ गटाच्या महाराष्ट्र राज्य अँथलेटिक्सच्या अजिंक्यपद आणि निवड चांचणीचे आयोजन

Sep 1, 2021

नाशिक : महाराष्ट्र अँथलेटिक्स असोसिएशन आणि नाशिक जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी येथील सिंथेटिक ट्रॅकवर उद्या गुरुवार दिनांक २ आणि ३ सप्टेंबर २०२१ दरम्यान वरिष्ठ आणि यूथ गटाच्या महिला आणि पुरुष यांच्या महाराष्ट्र राज्य अँथलेटिक्सच्या अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चांचणीचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक एथलेटिक्स स्पर्धामध्ये असलेल्या नियमावलीप्रमाणे आणि भारतीय अँथलेटिक्स असोसिएशनने आखून दिलेल्या नियमावलीप्रमाणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे

सध्या करोंनाचा काळ असल्यामुळे भारतीय  अँथलेटिक्स असोसिएशन, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी जारी केलेल्या नियमावलीचा (sop) काटेकोरपणे अवलंब करून या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

त्यासाठी या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या खेळाडूनी आपल्यासोबत या स्पर्धेच्या वेळेच्या ७२ तास आधीचे निगेटीव्ह आर. टी. पी. सी. आर. (RTPCR) रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे. हा रिपोर्ट सादर करणाऱ्या खेळाडूंनाच या स्पर्धेत सहभागी केले जाणार आहे. तसेच या स्पर्धेदरम्यान या सर्व बाबींचे पालन व्हावे यासाठी प्रेक्षक, प्रशिक्षक, खेळाडूंचे कुटुंबीय, मित्र यांना स्टेडीयममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूनीही आपला क्रीडा प्रकार पूर्ण झाल्यानंतर ताबडतोब स्टेडीयम मधून बाहेर जावे लागणार आहे. जेणेकरून स्पर्धा स्थळी गर्दी टाळता येईल.

या स्पर्धेत १०० ,मीटर पासून ते दहा हजार मीटर धावणे, अडथळ्याच्या  शर्यती, चालणे, उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी, बांबू उडी, भालाफेक, थाळी फेक, गोळा फेक,  डीकेथलॉन , हॅपटेथलॉन,  स्टीपलचेस  अश्या  विविध क्रीडा  प्रकारांचा समावेश असणार आहे. या स्पर्धा दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी ०७.३०  वाजता सुरु होतील.  या स्पर्धांचे आयोजन भारताचे ऑलिंपियन खेळाडू तथा महाराष्ट्र अँथलेटिक्स असोसिएशनचे आणि भारतीय अँथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांच्या मार्गदर्शक सुचनाच्या अनुषंगाने  केले जात आहेत.

या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे पात्रता पूर्ण करणाऱ्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड केली जाणार आहे. हा निवड झालेला महाराष्ट्राचा संघ वारंगल येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होईल  अशी माहिती महाराष्ट्र अँथलेटिक्स असोसिएशनचे सचिव सतीश उचील आणि या स्पर्धा आयोजन समितीचे प्रमुख तथा जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशनचे चेअरमन हेमंत पांडे यांनी दिली.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ऑलिंपियन कविता राऊत , आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजेंद्र सिंग, जिल्हा सचिव सुनील तावरगिरी, वैद्यनाथ काळे यांच्या  मार्गदर्शनाखाली  तांत्रिक समिती प्रयत्नशील आहे.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News