नाशिक येथे वरिष्ठ आणि यूथ गटाच्या महाराष्ट्र राज्य अँथलेटिक्सच्या अजिंक्यपद स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात

Sep 2, 2021

लांब पल्याच्या शर्यतीत नाशिकचे वर्चस्व तर मुंबई, सातारा पुणे, हिंगोलीच्या खेळाडूंचीही चांगली कामगिरी. 

नासिकच्या संजिवनी,किसन तडवी,उपेंद्र बालियन यांना सुवर्णपदक.   

नाशिक  : महाराष्ट्र अँथलेटिक्स असोसिएशन आणि नाशिक जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी येथील सिंथेटिक ट्रॅकवर आयोजित केलेल्या वरिष्ठ आणि यूथ गटाच्या महिला आणि पुरुष यांच्या महाराष्ट्र राज्य अँथलेटिक्सच्या अजिंक्यपद स्पर्धाना आज मोठ्या उत्साहात सुरवात झाली.या स्पर्धेमध्ये लांब पल्याच्या शर्यतीत महिला गटात दहा हजार मीटर धावण्याच्या प्रकारात नाशिकची आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू संजिवनी जाधव हिने आपल्या लौकिकास साजेशी धाव घेऊन या प्रकारात ३५;१९:३० मिनिटामध्ये आपली  धाव पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. नागपूरच्या प्राजक्ता गोडबोलेने दुसरे तर ठाण्याच्या प्रियांका पाईकरावने तिसरे स्थान मिळविले. पुरुषांच्या दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत नाशिकचा आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू किसान तडवीनेही ३१;४५:९० मिनिटामध्ये ही रेस पूर्ण करून सुवर्णपदक पटकावून या प्रकारात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. तर सातारच्या आदिनाथ भोसलेने किसनला चांगली लढत देत ३३:०७:४० मिनिटामध्ये ही रेस पूर्ण करून दुसरा क्रमांक मिळविला.  नाशिकच्या कांतीलाल कुंभाराने त्याखालोखाल चांगली कामगिरी करून ३४:१०:८० मिनिटामध्ये ही रेस पूर्ण करत तिसरे स्थान पटकावले.२३ वर्ष वयोगटात मुलांमध्ये नाशिकच्या उपेंद्र बलियनने किसनप्रमाणेच आपली धाव ३१:५४:२० मिनिटामध्ये पूर्ण करून या गटात सुवर्णपदक पटकावले.  या प्रकारात सातारच्या बाळू पुकाळेने ३२:२७:५० मिनिटांची वेळ घेत दुसरा क्रमांक मिळविला तर नाशिकच्या नीरज यादवने ३३:३६:४० मिनिटामध्ये रेस  पूर्ण करून तिसरे स्थान मिळविले. २३ वर्ष मुलींच्या गटात दहा हजार मीटर प्रकारात सातारच्या रेश्मा केवाटेने ३७:४७:५० मिनिटामध्ये ही धाव पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले तर पुण्याच्या प्रेमलता यादव हिने ३९:१५:४० मिनटे घेत दुसरा क्रमांक मिळविला. या प्रकारात सर्वांना भरवसा असलेली नाशिकची पूनम सोनुने हिला आपली रेस अर्ध्यावर सुडून द्यावी लागली. अन्यथा या गटातही नाशिकने पदक मिळविले असते.मुलांच्या तिहेरी उडी या प्रकारात मुंबई उपनगरच्या अनिरुद्ध अय्यरने १४. ८३ मीटर झेप घेत पहिला क्रमांक मिळविला तर पुण्याच्या आकाश जाधव आणि अलिसाबीर तांबोळी यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळविले.  पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात मुंबईउपनगरच्या खेळाडूंनी संपूर्ण वर्चस्व राखत पहिल्या तीन क्रमांकावर आपले नाव कोरले. यामध्ये जय शहा, कृष्णा सिंग आणि अनिलकुमार साहू यांनी अनुक्रम पाहिले तीन क्रमांक पटकावले.२३ वर्ष मुलामध्ये १०० मीटर धावणे या प्रकारात रायगडच्या आतिफ लिम्बाडेने प्रथम, सातारच्या कुशल मोहिते आणि अभिजित भोसले यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला.    खुल्या गटात पुरुषामध्ये  १०० मीटर धावणे या प्रकारात ठाण्याच्या अक्षय खोतने पहिला, पुण्याच्या किरण भोसलेने दुसरा तर मुंबई शहरच्या हर्ष राणेने तिसरा क्रमांक मिळविला.महिलांच्या खुल्या गटात १०० मीटर धावणे या प्रकारात ठाण्याच्या दिन्द्रा वल्लादारेसने पहिला मुंबई शहरच्या भावेशा कोठारीने दुसरा तर ठाण्याच्या प्राची पावसकरने तिसरा क्रमांक मिळविला.जागतिक  अँथलेटिक्स   महासंघ आणि भारतीय अँथलेटिक्स असोसिएशनने यांच्या नियमावलीप्रमाणे या स्पर्धेची तांत्रिक समिती काम करत आहे.सध्या करोंनाचा काळ असल्यामुळे भारतीय अँथलेटिक्स असोसिएशन, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी जारी केलेल्या नियमावलीचा (sop) काटेकोरपणे अवलंब करून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी नेहमीप्रमाणे उदघाटन सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ याला फाटा देण्यात आला आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनासाठी उपस्थित असलेले पदाधीकारी, सदस्य यांच्या हस्तेच औपचारिक पूजा करून आणि नारळ वाढवून या स्पर्धेला आज सकाळी ७. ३० वाजता सुरवात करण्यात आली. तसेच या स्पर्धेत विजयी झेलल्या खेळाडूंना येथे उपस्थित असलेल्या पदाधीकारी यांच्या हस्ते सन्मानित केले जात आहे. यावेळीही सोशल डिस्टन्स राखणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे याची दक्षता घेतली जात आहे अशी माहिती महाराष्ट्र अँथलेटिक्स असोसिएशनचे सचिव सतीश उचील आणि नाशिक जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा या स्पर्धेचे प्रमुख हेमंत पांडे यांनी दिली.उद्या सकाळी ०७. ३० वाजता काही क्रीडा प्रकारच्या स्पर्धा होणार असून सायंकाळी ०४.३० वाजता या स्पर्धेची सांगता होईल असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे पात्रता पूर्ण करणाऱ्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड केली जाणार आहे. हा निवड झालेला महाराष्ट्राचा संघ वारंगल येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होईलया स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  जिल्हा सचिव सुनील तावरगिरी, वैद्यनाथ काळे,  प्रशिक्षक विजेंद्र सिंग, यांच्या  मार्गदर्शनाखाली  तांत्रिक समिती कार्यरत आहे.

आजच्या क्रीडा प्रकारचे निकाल :-

२३ वर्षे -मुले – १०००० हजार मीटर धावणे – १० उपेंद्र बलियन (नाशिक) – प्रथम , २) बाळू पुकुले ( सातारा) दुसरा क्रमांक, ३) निरज यादव (नाशिक) – तिसरा क्रमांक.

१०० मीटर धावणे – १) आतिफ लिम्बाडे (रायगड) – प्रथम, २) कुशल मोहिते (सातारा) – दुसरा क्रमांक ३) अभिजित भोसले ( सातारा)  – तिसरा क्रमांक

 पुरुष – खुला गट – १०००० हजार मीटर धावणे – किसान तडवी (नाशिक) – प्रथम , २) आदिनाथ भोसले ( सातारा) दुसरा क्रमांक, ३) कांतीलाल कुंभार  (नाशिक) – तिसरा क्रमांक.

तिहेरी उडी  – १) जय शहा  – प्रथम, २) कृष्णा सिंग – दुसरा क्रमांक ३) अनिलकुमार साहू  – तिसरा क्रमांक (तिघेही मुंबई उपनगर)

 

२३ वर्षे – मुली – १०००० हजार मीटर धावणे १) रेश्मा कवठे – (सातारा) – प्रथम २) प्रेमलता यादव (पुणे) दुसरा क्रमांक

१०० मीटर धावणे – १) अवंतिका नारळे (पुणे ) – प्रथम, २) श्रेया मुळक  (सातारा) – दुसरा क्रमांक ३) सरोज शेट्टी  (मुंबई सिटी )  – तिसरा क्रमांक

महिला – खुला गट – १०००० हजार मीटर धावणे – १) संजीवनी जाधव (नाशिक) – प्रथम , २) प्राजक्ता गोडबोले (नागपूर ) दुसरा क्रमांक, ३) प्रियांका पाईकराव  (ठाणे ) – तिसरा क्रमांक.

१०० मीटर धावणे – १) दिन्द्रा वल्लादारेस  (ठाणे ) – प्रथम, २) भावेशा कोठारी  मुंबई शहर ) – दुसरा क्रमांक ३) प्राची पावसकर (ठाणे )  – तिसरा क्रमांक

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News