नाशिक : महाbराष्ट्र अँथलेटिक्स असोसिएशन आणि नाशिक जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी येथील सिंथेटिक ट्रॅकवर आयोजित केलेल्या वरिष्ठ आणि यूथ गटाच्या महिला आणि पुरुष यांच्या महाराष्ट्र राज्य अँथलेटिक्सच्या अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पुणे संघाच्या खेळाडूंनी तर मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी वर्चस्व राखून चांगली कामगिरी करून विविध प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले.

नाशिकच्या कोमल जगदाळेने ३००० मीटर स्टीपलंचेस या प्रकारात सुंदर कामगिरी करून १०:३४:२८ मिनिटामध्ये ही रेस पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. तर२३ वर्षे मुलीच्या थाळी फेक प्रकारात नाशिकच्या अमीरा शेखने ३९.९४ मीटर थाळी फेकून सुवर्णपदक मिळविले. तर सोलापूरच्या संतोषी देशमुखने त्याखालोखाल ३९. १३ मीटर फेक करून दुसरा क्रमांक मिळविला. ५००० हजार मीटर धावणे प्रकारात नाशिकच्या किसान ताडवीने पुन्हा सुंदर कामगिरी नोंदवली. त्याने १५:१२ :६१ मिनिटामध्ये ही रेस पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. तर अहमदनगरच्या उमेश कातोरेने १७:२३:२४ मिनिटामध्ये रेस पूर्ण करून दुसरे स्थान मिळविले तर पुण्याच्या अभिषेक गर्जेने २०:५१:३९ मिनिटे घेत तिसरे स्थान मिळविले. महिलांच्या ५००० काल दहा हजार मीटरमध्ये सुवर्णपदक मिळविणारी नाशिकच्या संजिवनी जाधवनेही १६:३०:७२ या रेकॉर्ड वेळेत हे अंतर पूर्ण करून दुसरा क्रमांक मिळविला. तर नागपूरच्या निकिता राऊतने १७:०४:७२ मिनिटात ही रेस पूर्ण करून तिसरे स्थान मिळविले. महिलांच्या ८०० मीटर धांवणे प्रकारात नाशिकच्या यमुना लडकतने हे अंतर २:०८:७९ मिनिटे या रेकॉर्ड वेळेत पूर्ण करून सुवर्णपदक मिळविले तर मुंबई शहरच्या एलिना अल्फोन्सोने ३:०९:३६ मिनिटाची वेळ घेत दुसरे स्थान मिळविले. २३ वर्षे मुलीमध्ये ८०० मीटर धावणे प्रकारात नाशिकच्या दिशा बोरसेने २:१७:२३ मिनिटामध्ये हे अंतर पार करून सुवर्णपदक मिळविले तर कोल्हापूरच्या रोहिणी पाटीलने २:२४:४२ मिनिटे घेत दुसरे स्थान मिळविले.
२३ वर्षे मुलामध्ये ३००० मीटर स्टीपलंचेस मध्ये नाशिकच्या शुभम भंडाराने हे अंतर ९:३४:९९ मिनिटामध्ये पूर्ण करून पहिला क्रमांक मिळविला. सातारच्या आदित्य भोसलेने ९:४२:१८ मिनिटामध्ये हे अंतर पूर्ण करून दुसरे स्थान मिळविले तर सातारच्याच हर्षवर्धन दाबाडेने ९:४३:४० मिनिटामध्ये रेस पूर्ण करून तिसरा क्रमांक मिळविला.
२३ वर्षे मुलामध्ये १०० मिटर धावणे प्रकारात कोल्हापूरच्या निखिल पाटीलने १०. ५७ सेकंदात आपली धाव पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले, पुण्याच्या प्रणव गुरवाने १०.७१ सेकेंडत रेस पूर्ण करून दुसरा क्रमांक मिळवला. तर पुण्याच्या अक्षय पाटीलने तिसरेस्थान प्राप्त केले.
२३ वर्षे मुलाच्या गटात ४०० मीटर धावणे प्रकारात रायगडच्या आताफ लिम्बडे ने ५३.०२ सेकंदात रेस पूर्ण करून सुवर्णपदक तर सातारच्या कुशल मोहितेने ५३.२८ सेकंदात हे अंतर पूर्ण करून दुसरे स्थान मिळविले तर हिंगोलीच्या विकास पवारने ५५. १२ सेकंदात हे अंतर पार करून तिसरा क्रमांक मिळविला.
उंच उडीमध्ये पुण्याच्या खेळाडूंनी चागले प्रदर्शन करून पहिला आणि दुसरा क्रमांक मिळविला. या प्रकारात पुण्याच्या आभार दत्त याने २. ०० मीटर उंच अंतर पार करून पाहिले स्थान मिळवली तर त्याचा जोडीदार मनोक रावतने १.९५ मीटर उंच अंतर पार करून दुसरे स्थान मिळविले.
हातोडा फेक (हॅमर थ्रो) या प्रकारात पुण्याच्या शंतनू उच्चलने ५१. २८ मीटर हातोडा फेकून सर्वांना मागे टाकत सुवर्णपदक पटकावले. भांडाराच्या समीर देशमुखने केवळ ४६. ०६ मीटर फेक करून दुसरे स्थान मिळविले. तर सातारच्या समीर देशमुखने ४६. ,मीटर हातोडा फेकून तिसरा क्रमांक मिळविला. पुरुषांच्या खुल्या गटात हातोडा फेक (हॅमर थ्रो )मध्ये पुण्याच्या प्रसाद देशमुखने ४५.४६ मिटर फेक करून सुवर्णपदक मिळविले.
पुरुषांच्या ४०० मीटर धावणे प्रकारात पुण्याच्या रितेश इथापेने सर्वात वेगवान धाव घेऊन ४८. ३८ सेकंदात हे अंतर पार करून पहिला क्रमांक मिळविला तर अमरावतीच्या सचिन नन्हेंने त्याखालोखाल ४८. ८३ सेकंदात आपली धाव पूर्ण करून दुसरा क्रमांक मिळविला. अहमदनगरच्या फय्याज तांबोळीने हे अंतर पार करण्यासाठी ५१. १४ सेकेंडची वेळ घेत तिसरा क्रमांक मिळविला.
२३ वर्षे मुलींमध्ये गोळाफेक प्रकारात पुरुषाप्रमाणे पुण्याच्या मुलींनीही वर्चस्व राखले. यामध्ये पुण्याच्या ऋषीका नेपाळीने सर्वात जास्त ९.४४ मीटर गोळा फेकून पहिला क्रमांक मिळविला तर पुण्याच्याच साक्षी पागनीसने ८.७४ मीटर फेक करून दुसरा क्रमांक मिळविला तर नाशिकच्या निकिता दरेकरने ८.०६ मीटरवर गोळा फेकून तिसरे स्थान मिळविले.
भालाफेक प्रकारात मुंबई उपनगरच्या साक्षी परमारने ४०.०४ मीटरवर भाला फेकून पहिला क्रमांक मिळविला.
१५०० मीटर धावाने या प्रकारात सातारच्या वैष्णवी सावंतने ४:४६:४४ मिनिटात हे अंतर पार करून पहिला क्रमांक मिळविला. तर नाशिकच्या दिशा बोरसेने ४:४७:१३ वेळ घेत दुसरे स्थान मिळवली नागपूरच्या रिया धोत्रेने हे अंतर ४:५४:३९ मिनिटामध्ये पूर्ण करून तिसरे स्थान मिळविले.
२३ वर्षे मुलीच्या लांब उडी मध्ये मुंबई उपनगरच्या शर्वरी परुळेकरने ५.७१ मिटर लांब झेप घेत पहिला क्रमांक मिळविला. तर सातारच्या संपदा ढमाळने ५.४४ मीटर पार करून दुसरा क्रमांक मिळविला मुंबई उपनगरच्या श्वेता ठाकूरने ५.०६ मीटर झेप घेत तिसरा क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत विजयी झेलल्या खेळाडूंना येथे उपस्थित असलेल्या पदाधीकारी यांच्या हस्ते सन्मानित केले गेले. यावेळीही सोशल डिस्टन्स राखणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे याची सर्व प्रकारे दक्षता घेतली गेली.
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे महाराष्ट्राच्या संघाची निवड केली जाणार आहे महाराष्ट्र चा संघ तेलंगणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करील अशी अशा महाराष्ट्र अँथलेटिक्स असोसिएशनचे सचिव सतीश उचील आणि नाशिक जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा या स्पर्धेचे प्रमुख हेमंत पांडे यांनी व्यक्त केली.






