नाशिक – अनुसूचित जातीच्या मुला मुलींना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
2019-20 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज 29 जुलै 2019 सायंकाळी 5 वाजेपर्यंत www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावेत. विलंबाने प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्राची वाजे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नाशिक यांनी केले आहे.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





