जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (दि.५) सकाळी ‘प्रहार’चे जिल्हाप्रमुख अनिल भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजीवनगर येथे बांधकाम मजुरांना रेनकोट वाटप, नाशिक पूर्व मतदारसंघातील विधवा महिलांना साडीचोळीचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ‘संत गाडगेबाबा रोटी अभियानांतर्गत पेठ फाटा येथील मजुरांना खिचडीचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके, युवा जिल्हा अध्यक्ष जगन काकडे, शहर प्रमुख शाम गोसावी, सामाजिक कार्यकर्ते सुभाष जगताप, प्रशांत कुमावत आदी उपस्थित होते.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





