एन. टी. पी. एस. स्पोर्ट्स क्लब तर्फे प्रभाग सभापती विशाल संगमनेरे यांचा सत्कार

Jul 6, 2019

एन. टी. पी. एस. स्पोर्ट्स क्लबच्या उपक्रमांना यापुढेही सहकार्य मिळेल –  विशाल संगमनेरे  

नाशिक :- नाशिक महानगर पालिकेच्या प्रभाग समितीच्या सभापतींची निवड  झाली आहे. या निवड प्रक्रियेत नाशिकरोड प्रभाग समितीच्या सभापतीपदी नाशिकरोड प्रभाग क्रमांक १८ चे नगरसेवक  विशाल संगमनेरे यांची  निवड बिनविरोध  झाली आहे. या निवडीबद्दल  विशाल संगमनेरे यांचा एन. टी. पी. एस. स्पोर्ट्स क्लबतर्फे  भव्य सत्कार करण्यात आला. एन. टी. पी. एस. स्पोर्ट्स क्लबचे व्हॉलीबॉल प्रशिक्षक मनोज म्हस्के, क्रीडा शिक्षक मधुकर वाघ, स्वप्नील पाटील, सारंग येवले सतीश सोनावणे , बंडू जमदाडे, मिलिंद जाधव, भय्या सांगळे, प्रज्वल पिंपळकर, अभिषेक सोनावणे, शुभम पळसपगार,  गजानन फणसे, प्रसाद कौठकर, , गणेश जगताप आणि स्पोर्ट्स क्लबचे सर्व खेळाडू या सर्वातर्फे विशाल संगमनेरे  यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.  एन. टी. पी. एस. स्पोर्ट्स क्लबच्या मार्फत नियमित दिले जाणारे खेळाचे प्रशिक्षण, विविध स्पर्धांचे आयोजन, शिबीरे अश्या प्रत्येक उपक्रमासाठी श्री विशाल संगमनेरे  यांचे  नेहमीच मोलाचे सहकार्य मिळत आहे.  
यावेळी नगरसेवक शरद मोरे, विकी थोरात हे देखील उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देतांना विशाल संगमनेरे यांनी सांगितले की एकलहरे भागात कार्यरत असलेल्या  एन. टी. पी. एस. स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून या परिसरातील खेळाडूंना चांगल्या प्रकारे खेळाचे प्रशिक्षण दिले जाते.   त्यामुळे एन. टी. पी. एस. स्पोर्ट्स क्लबसाठी मला जे  काही सहकार्य करणे शक्य आहे ते मी करत असतो. यापुढेही त्यांना अश्या प्रकारे मदत केली जाईल असे सांगितले. .

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News