नाशिक :-नाशिकचे प्रसिद्ध वाहतुक व्यावसायीक लक्ष्मण पाटील यांची अवजड वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र अवजड वाहतूक सेनेचे अध्यक्ष इंद्रजीत सिंह बल यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल वाहतूक संघटनांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थापन केलेल्या अवजड वाहतूक सेनेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी विश्वास दाखवील्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी लक्ष्मण पाटील यांनी अवजड वाहतूक सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर अवजड वाहतूक दारांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी आश्वासित केले.यावेळी अवजड वाहतूक सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष इंद्रजीत सिंह बल, इंद्रजीतसिंह मारवा सत्ती, नरेंद्र पाटील, शहाजी पाटील, मनोज उदावंत, दीपक ताकाटे, स्वप्नील पांगरेयांच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






