नाशिक-येवला व चांदवड-विंचूर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची छगन भुजबळ यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी

Jul 6, 2019

नाशिक, येवला :- आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने हाती घ्यावयाच्या पहिल्या टप्प्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक-निफाड-येवला व चांदवड-लासलगांव-विंचूर रोड या रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्याची मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी मंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्यासोबत चर्चा केली आहे.

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील कामांमध्ये नाशिक जिल्ह्यातील नाशिक निफाड-येवला व चांदवड-लासलगांव-विंचूर रोड या रस्त्यांचा समावेश करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. नाशिक-निफाड-येवला या चौपदरी रस्त्याची पिंपळस ता.निफाड ते येवला या दरम्यान अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. सदर रस्ता हा मुंबई व मराठवाड्याला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. सदर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्त्याची चाळण झालेली आहे. या रस्त्याची दुरुस्ती न केल्यामुळे खड्यांमध्ये वाढ होवून मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

त्याचप्रमाणे चांदवड-लासलगाव-विंचूर रोड हा रस्ता गुजरातकडून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाचा रस्ता असल्याचे भुजबळांनी चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. या दोन्ही रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून सदर दोन्ही रस्त्यांसाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. 

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News