महाराष्ट्र राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत नाशिकच्या संघाला विजेतेपद

Nov 2, 2021

आकांक्षा शिंदे,ईशान सोनावणे, लोकेश  सानप, वैभवी आहेर, गामीनी टोपले यांची सुवर्णपदकाला गवसणी 

नाशिक  :-  दि. ३० व ३१ ऑक्टोंबर २०२१ दरम्यान सांगली येथे सब जुनिअर आणि कॅडेट गटाच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील ४१० खेळाडूंनी  सहभाग नोंदवला.  या स्पर्धेत नाशिकच्या २२ खेळाडूंनी विविध वजनी गटात चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून  ५ सुवर्णपदके, ३ रौप्य पदके तर ६ ब्राँझ पदकांची कमाई करून  या स्पर्धेत आपली छाप सोडली.
 याशिवाय नाशिकच्या मुलीच्या संघाने २७ गुण मिळवत या स्पर्धेत सर्वसाधारण पदकावर आपले नांव कोरले.
तसेच सुयश वैद्य, निकित करडे,  प्रणय जाधव, ईश्वरी शिंदे, रोशन बेंडकोळी, रूपाली भोये, गणेश वाघेरे, गायत्री राऊत या नाशिकच्या खेळाडूंनी आपापल्या वजन गटात सहभाग घेत उत्कृष्ट्ट कामगिरी  केली.
या स्पर्धेत मुलींमध्ये ठाणे संघाने उपविजेतेपद मिळविले. तर मुलामध्ये पुण्याच्या संघाने सर्वात चांगली कामगिरी करून विजेतेपद मिळविले तर कोल्हापूर संघाने उपविजेतेपद मिळविले.

नाशिकच्या खेळाडूंना प्रशिक्षक योगेश शिंदे, स्वप्निल शिंदे, सुहास मैंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर संघाचे व्यवस्थापक म्हणून दिव्या कर्डेल  आणि योगेश  शिंदे यांनी काम पार पडले. तर या स्पर्धेत माधव  भट, योगेश  शिंदे, यांनी पंच म्हणून आपले योगदान दिले.

खेळाडूंच्या या यशाबद्दल यशवंत व्यायाम वतीने सुवर्ण पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना  प्रत्येकी रू.१०००/-  आणि रौप्य आणि कास्य पदक विजेत्यांना प्रत्येकी रु. ५००/-  देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

नाशिकच्या ज्युदो पटुंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल  नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशनचे जेष्ठ मार्गदर्शक रत्नाकर पटवर्धन, राज्य असोसिएशनचे खजिनदार तथा नाशिकचे  पदाधिकारी रवींद्र मेतकर, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक- सानप, ज्युदोचे माजी खेळाडू प्रशिक्षक आनंद अभ्यंकर, स्वाती कणसे आदिंनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
नाशिकच्या खेळाडूंची कामगिरी
सुवर्णपदक – आकांक्षा शिंदे, ईशान सोनावणे, लोकेश  सानप, वैभवी आहेर, गामीनी टोपले
रौप्यपदक  :- सई जगताप, वैष्णवी  खलाने, इशिता सोनवणे
कास्य पदक :- विरेंद्र शिंदे, सार्थक कांबळे, मंजिरी  बस्ते, तनुजा वाघ, प्रतिक्षा कराड, उत्तम महाले
स्पर्धेचा निकाल :-   मुली- सर्वसाधारण विजेतेपद –   नाशिक,
उपविजेतेपद –   ठाणे.
                            मुले –  सर्वसाधारण विजेतेपद –   पुणे,
 उपविजेतेपद –   कोल्हापूर

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News