नाशिक :- महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशन आणि नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नाशिकच्या के. एन . डी. मंडळ यांच्या सहकार्याने नाशिकच्या कालिका देवी मंदिर येथील हॉलमध्ये मिशन ऑलीम्पिक अंतर्गत चाईल्ड गटांच्या पहिल्या महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची आज मोठया उत्साहात सांगता झाली. या स्पर्धेत फॉईल प्रकारात मुलामध्ये रायगडच्या खेळाडूंनी संपूर्ण वर्चस्व राखत पाहिले तीन क्रमांक आपल्या नांवे केले. रायगडच्या विवेन शेट्टीने चांगली कामगिरी करून अंतिम लढतीत आपल्याच जिल्ह्याच्या ओजस पवारहीला ८-५ असा पराभव करून विजेतेपद मिळविले. तर रायगडच्या आदित्य गौडा आणि विनय दुणा यांनी संयुक्त तिसरा क्रमांक मिळविला.
या प्रकारात मुलींमध्ये साताराच्या आर्या पोळने अंतिम लढतीत रायगडच्या क्रिश शहा हीचा ९-४ अश्या गुणांनी पराभूत करून विजेतेपद मिळविले. या वराकारात नाशिकच्या संतुष्टी नलगे आणि रायगडच्या प्रिशा क्षेत्री यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
सॅबर या प्रकारात मुलांमध्ये नाशिकच्या आयुष गावलेने अंतिम लढतीत रायगडच्या अन्वर हुसेनला ९-६ असे पराभूत करुय्न विजेतेपद मिळविले. तर मुलींमध्ये सातारच्या नूतन वरखखेडे प्रथम क्रमांक तर सोलापूरच्या समृद्धी घाले हिने दुसरा क्रमांक मिळविला.
या स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे भाजप युवा महानगरचे अध्यक्ष प्रवीण भाटे, शिवा फ्रेंड्स सर्कलचे संस्थामक अध्यक्ष सोमनाथ वडजे, क्रीडा संघटक आनंद खरे, राजू शिंदे, राजेंद्र माने, अशोक दुधारे यांच्या उपस्थित पार पडला. या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रजत आणि कास्य पदके आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलतांना सोमनाथ वडजे यांनी सांगितले की खेळांना आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. खेळाडूंनी चांगली मेहनत घेऊन आपल्या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवावे. खेळाडूंना यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रस्थाविक जिल्हा सचिव राजू शिंदे यांनी केले. त्यांनी सांगितले की. खेळाडूंनी लहान वयापासूनच स्पर्धामध्ये सहभाग घेऊन आपले कौशल्य विकसित करावे. त्यामुळे खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय स्पर्धांबरोबरच आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये आणि ऑलीम्पिकपर्यंत जाण्याचे धेय्य उराशी बाळगून सात्यात राखून पुढे प्रगती करावी यासाठीच या मिशन ऑलीम्पिक २०२८ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. असे सांगितले.
या स्पर्धाची तांत्रिक बाजू राज्य तलवारबाजी असोसिएशनचे तांत्रिक समिती प्रमुख राजू शिंदे आणि दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय देशमुख, जय शर्मा, दुष्यन्त शिर्के, राहुल फाडोळ, सायली सूर्यवंशी, आदी सांभाळत आहेत.
अंतिम निकाल :-
सॅबर मुले – १)आयुष्य गावले ( नाशिक ) – प्रथम, २) अन्वर खान (रायगड ) – दुसरा क्रमांक
३) विव्हेन शेट्टी ( रायगड) आणि वेदांत ढसाळ (सोलापूर ) – युक्त तिसरा क्रमांक.
सॅबर मुली – १) नूतन वरखडे (सातारा) – प्रथम, २) समृद्धी घाले ( सोलापूर ) – दुसरा क्रमांक
३) प्रिशा क्षेत्री (रायगड ) आणि आद्या आहेर (नाशिक ) संयुक्त तिसरा क्रमांक.
फॉईल मुले – १)विवेन शेट्टी – प्रथम, २) ओजस पवार – दुसरा क्रमांक
३) आदित्य गौडा आणिविनय दिने – सयुक्त तिसरा क्रमांक. (सर्व रायगड)
फॉईल मुली – १)आर्या पोळ (सातारा) – प्रथम, २) कैहा शहा ( रायगड ) – दुसरा क्रमांक
३) प्रिशा क्षेत्री (रायगड ) आणि संतुष्टी नलगे (नाशिक ) संयुक्त तिसरा क्रमांक.






