पोलिओच्या यशस्वी निर्मुलनानंतर, नाशिक ते नागपूर भागातला दुष्काळ दूर करण्यासाठी जलसंधारणाची कामे करणार : रो.गव्हर्नर राजेंद्र भामरे

Jul 7, 2019

नाशिक : पदेशात रोटरीच्या माध्यमातून पोलिओचे यशस्वी निर्मूलन झाले आहे. यापुढे पाण्याच्या  समस्येचे गांभीर्य आणि काळाची गरज ओळखून रोटरी मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे हाती घेणार असून, यासाठी डीसस्ट्रीक ३०३० अंतर्गत येणाऱ्या नाशिक ते नागपूर या पट्ट्यातील सर्व दुष्काळी भागात  ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी पुढील एक वर्ष ‘दुष्काळ निर्मुलन वर्ष’ म्हणून रोटरी काम करणार असल्याची माहिती रोटरी इंटरनॅशनल डीसस्ट्रीक ३०३० नवनिर्वाचित गव्हर्नर राजेंद्र भामरे यांनी दिली आहे. गव्हर्नर राजेंद्र भामरे हे नाशिक ते नागपूर या भागातील ९३ क्लबचे अध्यक्ष आणि सुमारे सात हजार सदस्य असलेल्या डीसस्ट्रीक ३०३० चे  गव्हर्नर झाले आहेत. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब नाशिक नॉर्थचे अध्यक्ष महेश गाडेकर, राकेश दीदवानिया, संदीप पवार, दादा देशमुख उपस्थित होते.रोटरीच्या इतिहासात प्रथमच ग्रामीण भाग व त्यातही पोलिओ साठी अजूनही संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मालेगावमधून रो.राजेंद्र भामरे यांची गव्हर्नरपदी निवड झाली आहे. रो.भामरे यांचा कार्यकाल हा १ जुलै २०१९  ते ३०  जून २०२० पर्यंत असणार आहे. शहरातील गंगापूर रोड येथील गुप्ता गार्डन येथे पार पडलेल्या ‘स्नेहारंभ’ कार्यक्रमात राजेंद्र भामरे यांनी डीसस्ट्रीक ३०३० च्या गव्हर्नर पदाची सूत्रे मावळते गव्हर्नर राजीव शर्मा यांच्याकडून बॅच स्विकारत पदभार स्विकारला आहे. रोटरी इंटरनॅशनल चे डायरेक्टर रोटेरीअन कमल संघवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थने केले होते.सध्या सर्वत्र पाण्याचे संकट निर्माण होत असून पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब साठवणे गरजेचे आहे. पाण्याचे हेच महत्व ओळखून रोटरी काम करणार आहे. यासाठी तलाव, विहिरी आदीचे खोलीकरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, असे विविध उपक्रम हाती घेतले जाणार असल्याचे गव्हर्नर राजेंद्र भामरे यांनी सांगितले.यावेळी रोटरी इंटरनॅशनल चे डायरेक्टर रोटेरीयन कमल संघवी म्हणाले की “रोटरी हा एक मोठा परिवार आहे, रोटरीतील सदस्यांनी ठरवेल तर ते अनेक मोठे बदल घडवून आणतात, रोटरीतील सदस्यांचे मुख्य काम म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांच्या पर्यंत मदत पोहचवणे, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे होय. घरातील व्यक्तींची जो योग्य काळजी घेतो तो सदस्य नक्कीच समाजाची योग्य काळजी घेवू शकतो, त्यामुळे आपण सर्वांनी समाजासाठी उपयोगी कार्य करणे गरजेचे आहे.”  कायर्क्रमाच्या सुरुवातील मावळते गव्हर्नर राजीव शर्मा यांनी त्यांच्या कार्यकाळातील कामांची माहिती दिली. कायर्क्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब नाशिक नॉर्थ चे अध्यक्ष महेश गाडेकर यांनी केले. यावेळी पिडीजी  बाळासाहेब शिराळकर, पिडीजी सतीश सुळे, रो.डॉ. मुकादम, पिडीजी राजे संग्रामसिंग भोसले, पिडीजी किशोर केडिया, महेश मोकाळकर, रमेश मेहेर,सुनील देशपांडे, मेजर खोत, नाना शेवाळे,मनीष ओबेराय यांच्यासह झारखंड,नागपूर, अमरावती, नाशिक, मालेगाव येथील सर्व क्लबचे अध्यक्ष व सचिव,सभासद आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. निखील खोत,अश्विनी जोशी यांनी केले.

रोटेरीयन राजेंद्र भामरे यांचा परीचय :

राजेंद्र भामरे सिव्हील इंजिनीअर असून,यशस्वी बांधकाम व्यवसायिक आहेत. या आगोदर त्यांनी अनेक संस्थाचे अध्यक्षपद भूषवले आहे. नाशिक मध्ये त्यातही ग्रामीण भागात रोटरी स्थापने नंतर ६० वर्षानंतर प्रथमच ग्रामीण भागातून त्यांच्या रूपाने गव्हर्नर म्हणून निवड झाली आहे.रोटरी सारख्या  आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेमध्ये डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून नियुक्त झालेले राजेंद्र भामरे यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. पोलिओ, टी.बी, हृदय शस्रक्रिया आणि तसेच शिक्षण,पर्यावरणाचा समतोल,जलसंधारण यासारख्या सामाजिक कार्यात रोटरीच्या माध्यमातून त्यांनी आपले कार्य उभे केले आहे. त्यांनी स्वतः ५५ वेळा रक्तदान करत रक्तदाता म्हणून नाव मिळवले आहे. राजेंद्र भामरे यांची डिस्ट्रिक्ट गव्हर्नर चे ट्रेंनिंग हे अमेरिकेत सनदीयागो येथे झाले,आपल्या अमेरिकेतील एक महिन्याच्या वास्तव्यात त्यांनी अनेक शहरांना भेटी देऊन तेथील स्थानिक क्लबला पार्टनर करून डिस्ट्रिक्ट3030 मध्ये जलसंधारण,आरोग्य,शिक्षण यामध्ये कार्य करण्यासाठी प्रवृत्त केले

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News