एन. टी. पी. एस. स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंना ट्रॅकसूटची भेट
नाशिक :- एकलहरे भागात कार्यरत असलेल्या एन. टी. पी. एस. स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून या परिसरातील खेळाडूंना विविध खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. या सुविधेमुळे खेळामध्ये आवड असलेल्या मुलां – मुलींना फायदा होत आहे. या खेळाडूंचा आणखी उत्साह वाढावा यासाठी नाशिक औष्णीक विद्युत केंद्र एकलहरेचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे, उपमुख्य अभियंता मोहन आव्हाड, प्रभारी उप मुख्य अभियंता राकेश कमटमकर, अधीक्षक अभियंता मनोहर तायडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विवेक मोरे यांच्या हस्ते खेळाडूंना ट्रॅक सूट देण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता, उमाकांत निखारे.यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की येथे खेळणाऱ्या बहुतेक खेळाडूंची आर्थीक परिस्थिती अगदी बेताची असूनही हे खेळाडू खेळात रस घेऊन प्रगती करून या परिसराचे आणि शाळेचे नांव उज्वल करत आहेत असे सांगितले आणि मुलांना प्रषिक्षण देणाऱ्या एन. टी. पी. एस. क्लबच्या प्रशिक्षकांचे कौतुक केले. या ट्रॅकसूट वाटप प्रसंगी वेळी एन. टी. पी. एस. स्पोर्ट्स क्लबचे व्हॉलीबॉल प्रशिक्षक मनोज म्हस्के, क्रीडा शिक्षक मधुकर वाघ,वसंत मुरकुटे, स्वप्नील पाटील, शशांक केसारखाने,प्रफुल कुलकर्णी, मंगेश ठुबे,हरीश आहेर, सतीश सोनावणे , बंडू जमदाडे, प्रज्वल पिंपळकर, अभिषेक सोनावणे, शुभम पळसपगार, गजानन फणसे, प्रसाद कौठकर, गणेश जगताप आदी सदस्य उपस्तीत होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक मनोज म्हस्के यांनी केले आभार प्रदर्शन बंडू जमदाडे यांनी तर मधुकर वाघ यांनी सूत्रसंचालन केले.





