व्यवसायाभिमुख असा डिप्लोमा इन इंटिरिअर डिझाइनचा कोर्स राज्य, देशातील तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन, थेट प्रत्यक्ष कामाचा अनुभव
नाशिक : एखाद्या विद्यार्थ्यांला शिक्षण घेतल्यानंतर किंवा शिक्षण सुरु असतांना रोजगार मिळणे अत्यंत आवश्यक असते. आजच्या शिक्षणाची हीच गरज ओळखून शहरातील आयडीया कॉलेज व्यवसायाभिमुख असा नवा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरु करत आहेत. ‘डिप्लोमा इन इंटिरिअर डिझाइन’ (Diploma in Interior Design) असे अभ्यासक्रमाचे नाव असून येत्या १ ऑगस्टपासून अभ्यासक्रम सुरु होत आहे. हा अभ्यासक्रम आधुनिक संगणकीयप्रणाली अर्थात सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शिकविला जाणार आहे.
नाशिकमध्ये विद्यावर्धन ट्रस्ट यांच्या मार्फत इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हार्मेंट अॅण्ड आर्किटेक्चर (Institute for Design Environment and Architecture) अर्थात आयडिया कॉलेज कार्यरत आहे.विद्यार्थ्यांना शिकवतांना थेट प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन घडवायचे याकडे कॉलेजचा कायमच प्रयत्न राहिला आहे. यातूच ‘डिप्लोमा इन इंटिरिअर डिझाइन’ या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. सदरचा अभ्यासक्रम स्वायत्त स्वरूपाचा असून तीन वर्षांचा पूर्णवेळ स्वरूपाचा आहे. तीन वर्षात एकूण सहा सेमिस्टर घेतल्या जाणार आहेत.
या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना इंटिरिअर डिझाइनच्या विविध प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळणार आहे. यातून डिझाईनचे बेसिक, मॉडेल मेकिंग, आर्ट आणि क्राफ्ट, डिझाईन ड्राइंग, कन्स्ट्रक्शन आणि मटेरियल आदी विषय शिकविण्यात येणार आहेत. याबरोबरच वेगवेगळ्या कार्यशाळा, सेमिनार आदीच्या माध्यमातून ही विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळणार आहे.
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
– १२ वी किंवा समकक्ष परीक्षा पास झालेले विद्यार्थी कोर्स करू शकतात.
– पहिले वर्ष संपल्यानंतर नामांकित ठिकाणी प्रत्यक्ष कार्यानुभव.
– आधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थी धडे गिरवणार.
– देश, राज्यातील तज्ञ मंडळी विद्यार्थ्यांना शिकवणार.
– गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेकडून शिष्यवृत्ती देण्यात येणार.
– कालावधी : तीन वर्षे, सहा सेमिस्टर, पूर्णवेळ.
– फी : ७५,०००रुपये.
प्रतिक्रिया
सध्या इंटिरिअर डिझाइनच्या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्या तरी कौशल्यपूर्ण आणि अनुभवी लोकांची कमतरता आहे. नेमके हेच ओळखून आयडीया कॉलेजने या प्रत्यक्ष अनुभवावर भर देणारा अभ्यास तयार केला आहे. हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्व:ता स्वतंत्रपणे कामाला सुरुवात करू शकतो. सोबतच नोकरी, वेगेवेगळ्या संस्थाना मार्गदर्शन,सल्लागार या संबंधित व्यवसायही करू शकतो. या क्षेत्रात नाविन्याला मोठे महत्व असून येथे सतत बदल होत असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे.
विजय सोहोनी, संचालक, आयडीया कॉलेज, नाशिक.





