पत्रकार दिनानिमित्त कालिका मंदिर ट्रस्ट, मराठा महासंघ आणि क्रीडा संस्कृती फौंडेशन यांच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

Jan 11, 2022

नाशिक –  कालिकादेवी  मंदिर ट्रस्ट, आखील भारतीय मराठा महासंघ, नाशिक  आणि क्रीडा संस्कृती फौंडेशन, नाशिक  यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ६ जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त नाशिकमंधील  वृत्तपत्र. आणि इलेक्रॉनिक मिडीयामध्ये कार्यरत असलेले पत्रकार आणि छाया चित्रकार यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सन्मान सोहळ्यात नाशिकमध्ये गेल्या चार दशकापासून पत्रकारितेमध्ये मोलाचे योगदान असलेले दैनिक सकाळचे सह संपादक विक्रांत मते  यांना  ” कै. कृष्णराव चिमणराव कोठवळे-पाटील ” जीवन गौराव   पुरस्कार “  देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तर नाशिक शहर आणि नाशिकच्या सर्व तालूक्यामध्ये आणि ग्रामीण भागात पत्रकारितेद्वारे समाजउपयोगी कार्य करणाऱ्या ४८ पत्रकारांना आणि छायाचित्रकारांना सन्मानित करण्यात आले. .
यामध्ये  सुधाकर गोडसे,राजेंद्र जाधव, मनोहर गायकवाड, पदमाकर देशपांडे, दादासाहेब गायकवाड, धनंजय बोडके,   दिनेश सोनावणे , संदीप शिंदे, मनोहर पाटील, तुषार जगताप, सचिन दीवटे, किरण आहेर, राजेंद्र शेळके, दिनेश जाधव, निलेश तांबे, हेमंत घोरपडे, विवेक बोकील , फारूक पठाण,  दामोदर थोरात, योगेश गांगुर्डे, नामदेव पवार, रवींद्र केडीया, नाना खैरनार,सतीश पाटील, प्रतीक देशमुख, आशुतोष लगड, सुधीर उमराळकर, सतीश नांदोडे, किरण कवडे, योगेश मोरे, रवींद्र आखाडे,प्रकाश उखाडे, सुनील बुणगे, योगेश पाटील, रामनाथ माळोदे, संदीप मोगल,राजू ठाकरे, सतीश देवगिरे, पंकज चांडोले, मनोहर शिंदे, दीपक भावसार, पल्लवी भावसार,  अश्विनी पांडे, करणसिंग बावरी, मदन बोरसे, अशोक आव्हाड आदीं पत्रकारांचा समावेश होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे धर्मादाय आयुक्त मा श्री जयसिंग झपाटे, कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील, खजिनदार सुभाष तळाजिया,, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, मराठा महासंघाचे क्रीडा विभागाचे प्रदेश अध्यक्ष अशोक दुधारे, शहर अध्यक्ष अशोक फडोळ, जिल्हा अध्यक्ष अशोक कदम, महिला जिल्हा अध्यक्षा  सौ. अस्मिता देशमाने आदी मान्यवर उपस्थित  होते.
. या मान्यवरांच्या हस्ते ” जीवन गौरव”  पुरस्कार विजेते विक्रांत मते  आणि इतर ४८ पत्रकारांना शाल, श्रीफळ,  सन्मानपत्र आणि चषक देऊन  सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलतांना श्री जयसिंग झपाटे  यांनी संगीतले की पत्रकाराची समाजाच्या जडण घडणीमध्ये महत्वाची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात महत्वाच्या घडामोडी वार्ता देणारे बहिर्जी नाईक- जाधव पासून ते  ६ जानेवारी १८३२ रोजी मराठी पत्रकारिता सुरु करणारे दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर यांच्या  योगदानामुळे मराठी पत्रकारितेला हे चांगले स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यांचा वारसा पुढे चालविणाऱ्या पत्रकारांनी  समाजाच्या जडण घडणीमध्ये वेळोवळी महत्वाची भूमिका पार पडलेली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या करोनाच्या काळात पत्रकारांनी आपला जीव धोक्यात घालून समाजाची सेवा करून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. पत्रकारामुळे प्रत्येक क्षेत्रातील  माहिती सर्वांपर्यंत पोहचते. त्यामुळे पत्रकारांचा सन्मान करणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो.  त्यामुळे पत्रकारांनी पत्रकारांसाठी  एक संस्था स्थापन करून त्यां संस्थेच्या माध्यमातून समाजाची अशीच सेवा सुरु ठेवावी असे सांगितले.
यावेळी  मराठा महासंघाच्या महिला जिल्हा अध्यक्षा  सौ. अस्मिता देशमाने  आणि केशव अण्णा पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अण्णासाहेब पाटील यांनी सांगितले की कालिका देवी मंदिर ट्रस्ट, मराठा महासंघ, क्रीडा संस्कृती यांच्या वतीने दरवर्षी समाजउपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा आम्ही सन्मान करतो. कारण चांगल्या कामाची दाखल घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना आणखी प्रोत्साहन मिळावे हा आमचा उद्देश आहे असे सांगितले.
यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देतांना श्री विक्रांत मते यांनी सांगितले की पत्रकाराचा सन्मान हा  कालिका देवी मातेचा प्रसादच आहे. या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे.  यापासून अधिक प्ररेणा घेऊन आणखी चांगले काम करण्यासाठी समाजातील जेष्ठ नागरिकांनी आणि संस्थांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रस्थाविक आनंद खरे यांनी केले तर  सूत्रसंचलन उदय खरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत  पाटील , रामा पाटील, मनीषा काठे, अर्जुन वेलजाळी, बाळू गुरव  शशांक वझे, मनोज खैरनार, दीपक निकम आदिंनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News