शासनाकडून जलशक्ती अभियानास सुरुवात; जलसुरक्षेसाठी जलशक्ती अभियान राबविणार :- जयंत खोब्रागडे

Jul 8, 2019

नाशिक – दुष्काळ सदृश्य परिस्थिती व कमी होत जाणारी भूजल पातळी यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारमार्फत जलशक्ती हे अभियान राबविण्यास 1 जुलै 2019 पासून सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत जलसंधारण व जलसुरक्षा या बाबींकडे लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याची माहिती अणुउर्जा विभागाचे सहसचिव जयंत खोब्रागडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित जलशक्ती अभियान नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, केंद्रीय पाणी व उर्जा संशोधन केंद्राचे वैज्ञानिक बी.आर.तायडे, लघुपाटबंधारे विभाग जि.प.कार्यकारी अभियंता मंगेश खैरनार, उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.खेडकर, भूजल सर्वेक्षण उपसंचालक जीवन बेडवाल आदी उपस्थित होते.
पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंधारण व गंगा पुनरुत्थान या केंद्रीय विभागांना एकत्रित करुन जलशक्ती मंत्रालय तयार करण्यात आले आहे. जलशक्ती अभियानांतर्गत महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, बुलढाणा, अमरावती, बीड व अहमदनगर या आठ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, पाणी अडवा-पाणी जिरवा, विंधन विहीर पुर्नभरण, वृक्षलागवड या कामांच्या माध्यमातून भूजल पातळीत वाढ करणे यावर लक्ष केंद्रीत जाणार असल्याचे  खोब्रागडे यांनी सांगितले.
जलसुरक्षा या अभियानांतर्गत जिल्हा परिषद, जलसंधारण, कृषी, सार्वजनिक बांधकाम, मृदा विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, वनविभाग, जलसंपदा विभाग यांच्या मार्फत सुरु असणाऱ्या पाण्यासंदर्भातील योजनांच्या माध्यमातून जलशक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने वरील सर्व विभागांनी एकमेकांच्या समन्वयाने जलशक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच जलशक्ती अभियानात लोकसहभाग महत्वाचा असल्याने शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, सामाजिक माध्यमांचा वापर, प्रचार व प्रसिद्धीसाठी करण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या.
सदर अभियानाच्या कामकाजासाठी विभागनिहाय नोडल अधिकारी यांची नेमणूकही जिल्हाधिकारी यांचेमार्फत करण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News