नाशिक – भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय यांचे 7 जून 2018 चे परिपत्रकानुसार गुणवंत खेळाडूकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्वव्रत करणे सक्रीय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही एक महत्वाची योजना आहे. या योजनेसाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवाशी असावा व त्याने ऑलिम्पिक , पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्रापत केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त/गुणवंत खेळाडूस ऑलिम्पिक /पॅरा ऑलिम्पिक गेम्स प्राविण्यधारक खेळाडूस दरमहा रुपये 20 हजार मानधन, सुवर्णपदक विश्वचषक/विश्व अजिंक्यपद स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असेलेले खेळ प्रकार) दरमहा रुपये 16 हजार मानधन, रौप्य व कास्य पदक विश्वचषक स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार ) व सुवर्ण पदक , कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स दरमहा रुपये 14 हजार मानधन, रौप्य व कास्य पदक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स,पॅरा एशियन गेम्स दरमहा रुपये 12 हजार मानधन देण्याची तरतुद केली आहे. तसेच पेन्शन 30 वर्षापासून मिळणाऱ्या खेळाडूवर देय असेल आणि त्याच्या/तिच्या आयुष्यादरम्यान कायम राहिल, परंतु अशी योजना लागू करतांना खेळाडू सक्रिय क्रीडा करियरमधून निवृत्त झाले असतील. (दर चार वर्षांनी आयोजित होणाऱ्या विश्वचषक /विश्व अजिंक्यपद स्पर्धा करिता सदरची योजना लागू राहील ) यासाठी पात्र खेळाडूंनी आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा असून विहित नमुन्यातील अर्जावर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळ संघटनेचे अध्यक्ष/सचिव यांची स्वाक्षरी किंवा उपसचिव/संचालक क्रीडा व युवक सेवा यांची स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन राज्याचे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.
सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे
Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...





