नाशिकचा तलवारबाजी खेळाडू अजिंक्य दुधारेची वर्ल्ड ग्रँड प्रिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

Jan 27, 2022

भारतीय संघ दोहा, कतार येथे स्पर्धेसाठी रवाना. महाराष्ट्राच्या डॉ. उदय डोंगरे यांची भारताचे व्यवस्थापक म्हणून नियुक्ती

नाशिक : दोहा, कतार येथे तलवारबाजी या खेळाच्या ईपी या प्रकाराच्या ग्रँड प्रिक्स आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय संघात महाराष्ट्र, नाशिकच्या अजिंक्य अशोक दुधारे याची निवड झाली आहे. तर भारताच्या संघाच्या व्यवस्थापकपदी महाराष्ट्राचे सचिव तथा भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे सहसचिव डॉ. उदय डोंगरे यांची निवड करण्यात आली आहे
भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक तथा खजिनदार बशीर अहमद खान यांनी भारताच्या आठ पुरुष आणि आठ महिला खेळाडूंच्या अंतिम नावांची घोषणा केली.
या वर्ल्ड ग्रँड प्रिक्स स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारताच्या संघाची निवड करण्यासाठी गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर, पंजाब येथे १४ जानेवारी, २०२२ रोजी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या निवड चाचणीमधून आठ पुरुष आणि आठ महिला खेळाडूंची भारताच्या संघासाठी निवड कारणात आली. दिनांक १५ ते २३ जानेवारी दरम्यान येथेच या खेळाडूंचे सराव शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या भारतीय संघामध्ये महाराष्ट्राकडून केवळ अजिंक्य दुधारे या एकाच खेळाडूची निवड झाली आहे. अजिंक्य दुधारे याने याआधी नऊ वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे, यामध्ये जागतिक स्पर्धा, आशियायी स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, दक्षिण आशियाई स्पर्धा आणि विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा समावेश आहे. सध्या अजिंक्य दुधारे हा महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अंतर्गत नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात तलवारबाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. परंतु तो सध्या अश्या जागतिक स्तरावर स्पर्धामध्ये सहभागी होत असल्यामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा संचालनालयाच्या वतीने त्याला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सवलत देण्यात आली आहे.
अजिंक्य दुधारे याच्या या निवडीबद्दल त्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक श्रीमती सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पल्लवी धात्रक, रायगडचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक. महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र सरकारचे मंत्री ना. सतेज पाटील याचबरोबर नाशिक तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता पाटील, सचिव राजू शिंदे कार्याध्यक्ष उदय खरे आदिंनी अभिनंदन केले आणि त्याला या स्पर्धेसाठी शुभेछ्या दिल्या. .

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News