” क्रीडा विषयक पथनाट्य” स्पर्धेचे आयोजन

Feb 3, 2022

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सवंगडी संस्था आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने

नाशिक :- सवंगडी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने समाजॊपयोगी उपक्रम राबवीले जात आहेत.क्रीडा व निसर्ग संवर्धन हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. यामध्ये नदी स्वच्छता, निसर्ग संवर्धन याबाबत विविध शाळांमध्ये जाऊन माहिती देणे, मुलांच्या सहभागातून बीजरोपण, बीज संकलन असे कार्यक्रम राबवणे, क्रीडाविषयक उपक्रमांतर्गत दृकश्राव्य माध्यमातून विविध खेळ, ते खेळ खेळण्याच्या पद्धती, त्यांचॆ नियम व अटी यांची माहिती दॆणॆ, तसेच क्रीडाविषयक प्रदर्शन भरविणे, विविध स्पर्धांचॆ आयॊजन, असे अनॆकविध उपक्रम राबविले जातात.
याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्थॆच्या वतीने *पथनाट्य* स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.यावर्षी दिनांक ४ मार्च, २०२२ रोजी सवंगडी संस्था आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा विषयक पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा पहिली चवथी आणि पाचवी ते सातवी अश्या दोन गटात आयोजित केली जाणार आहे.यामध्ये पहिल्या गटासाठी विषय ” भारतीय पारंपारिक खेळ” असा राहील, तर दुसऱ्या गटासाठी १) करोना काळातील व्यायामाचे महत्व. आणि २) क्रीडा संस्कृती ही काळाची गरज असे विषय देण्यात आले आहेत.
या विषयावर आपण पथनाटय सादर करणे आवश्यक आहे. दोन्ही गटांसाठी एका संघात जास्तीत जास्त दहा कलाकारांची मर्यादा असणार आहे. दोन्हीही गटासाठी वेळेची मर्यादा प्रत्येक संघासाठी पाच ते आठ मिनिटे राहील. पथनाटय सादर करतांना लागणाऱ्या आवश्यक त्या साधन – सामुग्रीचा आपण वापर करू शकता.
या स्पर्धेत दोन्ही गटात पहिल्या तीन क्रमांक मिळविणाऱ्या संघांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
ज्या संस्था / शाळा / ग्रुप यांना या पथनाटय स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
या स्पर्धेत नाशिकच्या जास्तीत जास्त संस्था/शाळा/ग्रुप यांनी सहभागी व्हावे असे अवाहन सवंगडी संस्था आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांनी केले आहे. आपण आपल्या प्रवेशिका प्रत्यक्ष जमा कराव्या अथवा व्हाट्सअँप करावी.
अधिक माहितीसाठी नितीन हिंगमिरे मो. क्र. ९४२०००२२४४ अथवा दीपक बैचे मो. क्र. ९८२२०८८०४०. यांच्याशी संपर्क करावा.
या स्पर्धा यशस्वी कारण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधीकारी प्रयत्नशील आहेत.

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News