नाशिकमध्ये  पहिल्या ज्युदो प्रिमीयर लीग स्पर्धेचे आयोजन

Jun 29, 2019

ज्युदो खेळाडूना संधी मिळावी यासाठी हा पहिला प्रयत्न – रत्नाकर पटवर्धन – सचिव- नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशन.

महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनच्या अधिपत्याखाली आणि परवानगीने   नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशन  आणि नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या  वतीने नाशिकमध्ये नाशिकच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या   ज्युदो हॉलमध्ये दिनांक ३० जून , २०१९ रोजी प्रथमच या पहिल्या ज्युदो प्रिमीयर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्हातील ८१ खेळाडू सहभागी होणार आहेत. या ८१  खेळाडूंमध्ये राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत पदक प्राप्त केलेल्या अनेक खेळाडूंचा समावेश असणार आहे.  ज्युदो हा खेळ वैयक्तिक स्वरूपाचा असला तरीही ही प्रिमीयर लीग स्पर्धा सांघिक स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे.  या स्पर्धेमध्ये  अंकाई अटॅकर्स, रायगड चैलेंजर्स, तुंग टायटन्स,शिवनेरी किंग्स,तोरणा टायगर्स,पन्हाळा पिलर्स, हरिहर हुंटर्स, लोहगड लिजंटस आणि चांदेरी क्रॅकर्स असे ९ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वरील प्रत्येक संघात या वजनी गटानुसार ९ खेळाडूंचा समावेश असणार आहेत. प्रत्येक संघातील  या नऊ खेळाडूंमध्ये किमान दोन खेळाडू हे राष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेते खेळाडूं असणार आहेत. या नऊ संघात  ४४ किलो, ४८  किलो, ५२  किलो, ५६  किलो, ५७  किलो, ६०  किलो, ६६  किलो, ७३  किलो, ८१  किलो अश्या नऊ वजनी गटांच्या खेळाडूंचा समावेश असणार आहे. या स्पर्धाच्या आयोजनासाठी काही समितीचे गठणं करण्यात आले आहे. त्यानुसार या स्पर्धेचे आयोजन सचिव म्हणून ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष रत्नाकर पटवर्धन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रविन्द्र नाईक, कार्यकारी समितीत रवींद्र मेतकर, विजय पाटील आणि माधव भट, स्पर्धा समन्वयक म्हणून  योगेश शिंदे , आयोजन समितीत  तुषार माळोदे, स्वप्नील शिंदे, सुहास मैद, वैष्णवी कणसे, स्वाती कणसे, ऋषिकेश वाघचौरे,दुर्गा जाधव, नामदेव कचरे, संदीप पाटील आणि बाळकृष्ण धोंडगे तर स्पर्धा संचालक म्हणून योगेश धाडवे आदी काम बघणार आहेत. 

या पत्रकार परिषदे दरम्यान नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव रत्नाकर पटवर्धन,  जिल्हा क्रीडा अधिकारी रविन्द्र नाईक, ,रवींद्र मेतकर, विजय पाटील, योगेश शिंदे   यांनी या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल माहिती दिली आणि ज्युदो खेळामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंचा सहभाग व्हावा हा स्पर्धेच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे असे सांगितले. 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News