महिला आणि बालके यांच्या विकासासाठी लक्ष केंद्रित करणार – नवनिर्वाचित अध्यक्षा विभावरी खोत 
नाशिक : समाजातील महिला आणि बालके यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करणार असल्याचे मत नव नवनिर्वाचित अध्यक्षा विभावरी खोत यांनी व्यक्त केले. नाशिक जिल्हा चार्टर क्रमांक ६३११ अंतर्गत इनरव्हील क्लब ऑफ जेन-नेक्स्ट नाशिकचा पदग्रहण सोहळा नुकताच हॉटेल व्हाईट एक्स कॉलेज रोड येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हीलच्या माजी जिल्हा अध्यक्षा प्रेरणा बेळे, मोनालिसा जैन उपस्थित होत्या.
नवनिर्वाचित अध्यक्षा विभावरी खोत यांनी मावळत्या अध्यक्षा दिपाली चांडक यांच्याकडून अध्यक्ष पदाची सूत्रेस्विकारली आहे. तर त्यांच्या सोबत माधुरी महाजन (सचिव), सरोज दशपुते (उपाध्यक्ष) , संध्या साखरे (खजिनदार) , ममता सारडा (ISO) , प्रतीक्षा साबु (CC) यांनी पदभार स्विकारला आहे.
या वर्षाची थीम टुगेदर वुई कॅन “Togather We Can” ही अशी आहे. या अंतर्गत कुठल्याही कामाला एकमेकांची साथ असणे आवश्यक असते, तर एकजुटीने आपण कुठलेही कार्य पूर्णत्वास नेऊ शकतो, असे प्रतिपादन मावळत्या अध्यक्षा, दिपाली चांडक यांनी केले. मागील वर्षाच्या विविध उपक्रमांचा आढावा माजी सचिव सरोज दशपुते यांनी सादर केला.
या वर्षी आम्ही काम करतांना, समाजातील विविध समस्या पाहता त्या विषयी जागरूकता निर्माण करणे हे उद्देश ठेवले आहे. या वेळी २०१९-२० या वर्षाकरीता इनरव्हील क्लब कडुन नाशिक शहरातील नद्या व त्यावरील पुल येथे इनरव्हीलच्या नावांचे समाज प्रबोधनपर फलक उभारणे, पाणी अडवा-पाणी जिरवा, प्लॅस्टिक मुक्त शहर असे विविध उपक्रम राबविण्याचा मानस नुतन अध्यक्षा विभावरी खोत यांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा साबु, रश्मी भुतडा यांनी केले. आभार प्रदर्शन सरोज दशपुत्रे यांनी केले. मोनालिसा जैन , मीनल पलोड, तृप्ती सोनी,दिपाली चांडक आदी सर्व महिला सदस्य उपस्थित होत्या.




