१२ फेब्रुवारीला ज्युडो जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन

Feb 11, 2022

खेळाडूंच्या जास्तीत जास्त सहभागासाठी आवाहन

नाशिक : दिनांक १७ ते २० फेब्रुवारी, २०२२ दरम्यान पुणे येथे वरीष्ठ गटाच्या महाराष्ट्र राज्य ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या पुरुष आणि महिला संघाची निवड करण्यासाठी नाशिक जिल्हा ज्युडो असोसिएशनच्या वतीने शनिवार दिनांक १२ फेब्रुवारी, २०२२ रोजी नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, येथे नाशिक जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत खालीलप्रमाणे वजनी गट आहेत.
पुरुषांसाठी ६० किलो, ६६ किलो, ,७३ किलो, ८१ किलो, ९० किलो, १०० किलो आणि १०० किलो वरील गट अश्या सात गटांचा समावेश असणार आहे तर महींलासाठी ४८ किलो, ५२,किलो, ५६ किलो, ६३ किलो, ७० किलो, ७८ किलो आणि ७८ किलो वरील गट अश्या सात गटांचा समावेश असणार आहे.


या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंनी आपल्या जन्म तारखेचा दाखला, आधार कार्ड आणि आपल्या जुडोच्या गणवेश यासह शनिवार दिनांक १२फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज स्टेडियम येथे सायंकाळी पाच वाजता उपस्थित राहावे.
या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन नाशिक जिल्हा ज्युडो असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News