इंग्लंडच्या यॉर्क सिटी येथे दिनांक २१ जुलै ते २ ऑगस्ट, २०१९ दरंयान आयोजित करण्यात आलेल्या डेका युके – २०१९ या स्पर्धेसाठी पात्र ठरलेला अम्मार मियाजी हा भारताचा पहिला खेळाडू
नाशिक : लंडन येथे होणाऱ्या जगातील सर्वात कठीण आणि साहसी असलेल्या या 10 X आयर्न मॅन ट्रायथलॉन मध्ये याआधी भारताच्या कोणाही व्यक्तीला सहभाग मिळालेला नाही
ही सर्वात मोठी अल्ट्रा ट्रायथलॉन स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय अल्ट्रा ट्रायथलॉन असोसिएशन आणि डेका यु . के., इंग्लंड यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या अल्ट्रा ट्रायथलॉनमध्ये कोणालाही सहभागी होता येत नाही. जे स्पर्धक या संस्थांनी ठरविलेले नॉर्मस पूर्ण करतील अश्याच स्पर्धकांना या अल्ट्रा ट्रायथलॉनमध्ये सहभागी होता येते. हे सर्व तपासून या संस्थाद्वारे खेळाडूला पात्र ठरविण्यात येते. या संस्थांच्या सर्व नॉर्मस अम्मार मियाजी याने पूर्ण केल्या आहेत. आणि त्यामुळे त्याला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. या स्पर्धेत पात्रता मिळवणारा तो पहिला भारतील आहे. आणि या स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधीत्व करेल.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूला खालिलप्रमाणे ही अल्ट्रा ट्रायथलॉन पूर्ण करावी लागणार आहे.
१) ३८ किलो मीटर स्विमींग – २४ तास.
२) १८०० किलो मीटर सायकलिंग – चार दिवस.
३) ४२५ किलो मीटर रनिंग – सहा दिवस. (एकूण १२ दिवस )
या 10 X आयर्न मॅन अल्ट्रा ट्रायथलॉनची सुरवात दिनांक २१ जुलै, २०१९ रोजी होणार आहे, तर दिनांक २ ऑगस्टला संपणार आहे.
स्पर्धकांसाठी कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
१) या ट्रायथलॉनमध्ये दिनांक २१ जुलै रोजी स्पर्धकांना ३८ किलो मीटर स्विमींग करावे लागणार आहे. त्यासाठी २४ तासाची वेळ दिली आहे.
२) त्यानंतर स्पर्धकांना १८०० किलो मीटर सायकलिंग करावे लागणार आहे. यासाठी चार दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे.
३) सायकलिंग झाल्यानंतर स्पर्धकांना ४२५ किलो मीटर रनिंग करावी लागणार आहे. खेळाडूंना हे आंतर सहा दिवसात पूर्ण करायचे आहे.
म्हणजेच या 10 X आयर्न मॅन अल्ट्रा ट्रायथलॉनमध्ये सहभागी स्पर्धकांना १२ दिवसात हे तीनही इव्हेंट्स पूर्ण करावे लागणार आहेत.
हे तीनही इव्हेंट्स पूर्ण करण्यासाठी खालीलप्रमाणे काही अटी आहेत.
१) या ट्रायथलॉनच्या आयोजकांनी ठरवून दिलेल्या वेळेतच स्पर्धकाला प्रत्येक इव्हेंट्स पूर्ण कराणे आवश्यक आहे. उदा. स्पर्धकांनी पहिल्या टप्प्यात ३८ किलो मीटर स्विमींगचे आंतर हे ठरवून दिलेल्या २४ तासाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. जर एखाद्या स्पर्धकाला त्यापेक्षा जास्त वेळ लागला तर त्याला पुढील इव्हेंटमध्ये सहभागी होता येणार नाही. जर स्पर्धकाने वेळेच्या आत हा स्विमींगचा इव्हेंट पूर्ण केला तर लगेचच दुसरा सायकलिंगचा इव्हेंट सुरु करायचा की पहिल्या टप्प्यासाठी असलेल्या २४ तासापर्यंत काही वेळ विश्रान्ती घ्यायची याची मुभा त्या स्पर्धकांना असेल. याचप्रमाणे १८०० किलो मीटर सायकलिंग आणि त्यानंतर ४२५ किलो मीटर रनिंग करतांनाही अशाच अटी असतील.
अश्या सर्वोच्च दर्जाच्या स्पर्धेसाठी निवड होणारा अम्मार मियाजी हा भारताच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. हा मान मिळाल्यामुळे आपला नाशिक जिल्हा, महाराष्ट्र राज्य
आणि आपल्या भारत देशासाठी ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.
कृ मेम्बर्सचे मोलाचे सहकार्य :- या 10 X आयर्न मॅन अल्ट्रा ट्रायथलॉनसाठी अम्मारने चांगली तयारी केली आहे. त्यासाठी त्याला कृ मेंबर्स मोलाचे सहकार्य लाभत आहे. ते खालीलप्रमाणे
१) डॉ वैभव महाजन – मास्टर ऑफ फिजिओथेरपिस्ट. ऑर्थोपेडिकस आणि स्पोर्ट्स इन्जुरीज स्पेशालिस्ट, संचालक कायनेसीस फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन सेन्टर.
डॉ वैभव महाजन हे फिजिओथेरपी ऑर्थोपेडिक्स आणि स्पोर्ट्स इन्जुरीज स्पेशालिस्ट असून त्यांनी याआधी खेळाडूंना आवश्यक फिटनेस, डाएट आणि स्टॅमिना टिकवून ठेवण्यासाठी काय आवश्यक आहे यासाठी काम केले आहे. (उदा. मुंबई इंडियन्स टीम, आय. पी. एल. स्पर्धा )
याचप्रमाणे डॉ . वैभव महाजन अम्मारसाठी अश्याच प्रकारे या 10 X आयर्न मॅन अल्ट्रा ट्रायथलॉनसाठी उपयोगी असणाऱ्या बाबींवर त्याला सहकार्य करत आहेत.
२) श्री सचिन गलांडे – बॉडी बिल्डिंग चॅम्पियन, फिटनेस कोच, संचालक आर्यन स्पोर्ट्स निवेक.
सचिन गलांडे हे स्वतः आशियाई बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सिल्वर मेडलिस्ट आहेत. तसेच खेळाडूंना फिटनेसचे मार्गर्दर्शन करतात. ते अम्मारसाठी आवश्यक फिटनेस आणि इतर बाबीसाठी सहकार्य करत आहेत.
श्री विलास इंगळे – सायकल देखभाल.
विलास इंगळे हे स्वतः तांत्रिक क्षेत्रात तज्ञ् असून ते अम्मांरसाठी सायकल्सच्या सर्व प्रकारच्या देखभालीची काळजी घेणार आहेत.
विजय काकड , टीम मॅनेजर – या सर्वात मोठया 10 X आयर्न मॅन अल्ट्रा ट्रायथलॉनसाठी सहभागी होणाऱ्या अम्मार मियाजींसोबत विजय काकड हे टीम मॅनेजर म्हणून भूमिका पार पडणार आहेत.
मुफद्द्ल रामपूरवाला आणि दूर्षत उस शरफ रामपूरवाला :- या दोघांची जोडी अम्मारची त्याच्या प्रत्यक्ष स्पर्धा काळात सर्व प्रकारची काळजी घेणार आहेत. म्हणजेच ते ” केअर टेकर” म्हणून महत्वाची भूमिका पार पडणार आहेत.
ट्रॅक सायकल्सचे संचालक राज लुथरा :- ट्रॅक सायकल्सचे संचालक राज लुथरा यांनी या उपक्रमासाठी मोलाची मदत केली आहे. त्यांचा याकामी फार मोठा सपोर्ट मिळाला आहे.
मोठा निधी आवश्यक :- या उपक्रमासाठी अम्मार मियाजीला सुमारे ४० लाखाच्या आसपास खर्च येणार आहे. यासाठी अम्मारला त्याच्याशी संबंधीत असलेल्या दानशूर व्यक्ती, संस्था यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. तरीदेखील हा मोठा निधी उभा करण्यासाठी अजूनही काही निधीची आवश्यकता आहे. यासाठी अजूनही अश्या दानशूर व्यक्ती आणि संस्थाचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
अम्मार मियाजीचा विश्वास :- आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आपण सर्वानी दिलेल्या शुभेच्छांनी तसेच करोडो भारतीयांकडून मिळालेल्या प्रेमामुळे मला फारच मोठी प्रेरणा मिळाली आहे. तसेच हा मोठा टप्पा योग्य प्रकारे पार पडावा यासाठी मला सर्व कृ मेंबर्स, नाशिक जिमखानाचे श्री नरेंद्र छाजेड, राधेश्याम मुंदडा, शेखर भंडारी , आनंद खरे आणि इतर मेंबर्स, तसेच आणि सर्व सहकारी यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. तसेच सायकलिंगमध्ये मदत करणारे ट्रॅक सायकल्सचे संचालक राज लुथरा याचा फार मोठा सपोर्ट मिळाला आहे. त्यामुळेच मी अथक मेहनत करून नक्कीच या स्पर्धेत भारताचा तिरंगा साता समुद्रापार फडकावणार आणि भारताचा पहिला 10 X आयर्न मॅन होण्याचा किताब मिळविणार असा विश्वास अम्मार मियाजीने व्यक्त केला आहे.
अम्मार मियाजीचे आजपर्यंतचे विक्रम
१) २०१५ – डेक्कन क्लीफहँगर (पुणे ते गोवा-६४० किमी सायकलिंग).
२) २०१६ – रेस अराउंड ऑस्ट्रिया (१५०० किमी सायकलिंग)
३) २०१७ – आयर्न मॅन किताब – साऊथ आफ्रिका (३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी रनिंग)
ही रेस पूर्ण करणारा फर्स्ट आयर्न मॅन ऑफ नाशिक. ज्याने रेकॉर्स टाइममध्ये ही रेस पूर्ण केली आहे.
४) २०१८ – रन द रण – कच्छ (१६१ किमी रनिंग)
५) २०१८ – मालनाड रन – (१०० किमी रनिंग)