नाशिक – जिल्हयातील सर्व सहकारी संस्थांनी 2018-19 या वर्षाचे लेखापरीक्षणासाठी नामतालिकेतील लेखापरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व संस्थांनी 31 मार्च 2019 अखेरचे वैधानिक लेखापरीक्षण 31 जुलै 2019 अखेर पूर्ण करुन घेणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम (81) (1) (अ) व कलम 75 (1) 75(5) मधील तरतुदीनुसार कायद्याने बंधनकारक आहे. नेमणूक केलेल्या सहकारी संस्थांनी संबधीत लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षण करुन घ्यावे. ज्या संस्था लेखापरीक्षण करुन घेणार नाहीत अशा संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. संबधीत लेखापरीक्षक यांनी लेखापरीक्षण पूर्ण केल्यापासून एक महिन्याच्या आत लेखापरीक्षण अहवाल संस्थेस, संस्थेचे निबंधक व जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालय यांना सादर करावा असे आवाहन, डी.एन.काळे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, नाशिक व गौतम बैसाणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांनी केले आहे.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...




