30 तासांत 154 खेळाडूंची विक्री

Feb 13, 2022

आयपीएल 2022 मेगा लिलावचा दुसरा दिवस बंगळुरूमध्ये सुरू आहे. 10 बोली लावणाऱ्या फ्रँचायझींनी आतापर्यंत 154 खेळाडूंना खरेदी केले आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टन 10 कोटींहून अधिक किमतीत विकला जाणारा पहिला खेळाडू ठरला. त्याला खरेदी करण्यासाठी पंजाब आणि हैदराबाद यांच्यात चुरशीची स्पर्धा होती.

मुंबई इंडियन्सने सिंगापूरच्या टीम डेव्हिडला 8.25 कोटीत खरेदी केले. टीम हा मधल्या फळीतील फलंदाज असून ऑफ-स्पिन देखील करू शकतो. त्याला घेऊन मुंबईने हार्दिकची कमतरता भरून काढली आहे यात शंका नाही. डेव्हिडने गेल्या वर्षी आरसीबीकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.

लिलावाचा दुसरा दिवस अनेक दिग्गज खेळाडूंसाठी चांगला गेला नाही. ऑस्ट्रेलियाला T20 विश्वचषक जिंकून देणारा ऍरॉन फिंच, इंग्लंडचा एकदिवसीय आणि T20 संघाचा कर्णधार ओएन मॉर्गन या दोघांनाही खरेदीदार मिळाला नाही. चेतेश्वर पुजारालाही खरेदीदार मिळू शकला नाही.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News