आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक अजिंक्य दुधारे यांना पी. एच. डी.

Jul 14, 2019

नाशिक :-  नाशिकचे तलवारबाजीचे आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू तथा क्रीडा प्रशिक्षक अजिंक्य दुधारे यांनी पी. एच. डी. ही पदवी प्राप्त केली आहे. 
अजिंक्य दुधारे हे तलवारबाजी या खेळात गेली २० वर्षांपासून खेळत आहेत. त्यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके प्राप्त केली आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा ” शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार ”  प्रदान करण्यात आला आहे. अजिंक्य दुधारे यांनी बी. पी. एड., आणि एम. पी. एड. पदवी प्राप्त केली असून या खेळात प्रशिक्षण देण्याचे काम करता यावे यासाठी त्यांनी तलवारबाजी या खेळात ” एन. आय. एस.”  ची पदवीही प्राप्त केली आहे. नवोदित खेळाडूंना त्यांच्या खेळातील अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी अजिंक्य दुधारे याची  महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय खात्यात क्रीडा प्रशिक्षक म्हणून दोन वर्षांपासून नेमणूक करण्यात आली आहे. 
आपल्याला क्रीडा क्षेत्रात आणखी चांगले काम करता यावे यासाठी  अजिंक्य दुधारे यांनी राजस्थान येथील जे. जे. टी.  विद्यापीठ येथे नुकताच  पी. एच. डी. चा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. यासाठी त्यांनी 
” योगाचा तलवारबाजी खेळतांना खेळाडूंना कसा फायदा होतो ” याविषयावर आपला प्रोजेक्ट पूर्ण केला. त्यांना या कामी गाईड म्हणूनडॉ. बलदेवसिंग यांचे मोलाचे 
मार्गदर्शन मिळाले.  
त्यांना विद्यापीठाचे प्रमुख डॉ.परमार सिंग यांच्या हस्ते पी. एच. डी.चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. बलदेवसिंग, श्रीमती मधू गुप्ता, महंमद इक्राम आदी मान्यवर उपस्थित होते. 
अजिंक्य दुधारे यांच्या या आणखी एक यशाबद्दल नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, छत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे, नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता पाटील,सचिव तथा छत्रपती पुरस्कार प्राप्त राजू शिंदे आणि क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी अजिंक्यचे अभिनंदन केले. 
माझ्या या यशामध्ये सर्वांचाच मोलाचा वाटा आहे. परंतु माझे आई आणि वडील यांच्या सततच्या  सहकार्यामुळेच मी हे यश मिळवले आहे असे अजिंक्य दुधारे यांनी यावेळी सांगितले.   
 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News