नाशिक -सीग्राम्स रॉयल स्टॅगला वेस्ट इंडिज क्रिकेट टीमच्या सध्या सुरू असलेल्या भारतातील दौऱ्याचे अधिकृत प्रायोजक म्हणून आपली भागीदारी घोषित करताना खूप अभिमान वाटत आहे. टीम वेस्ट इंडिज नैसर्गिक कॅरेबियन उत्साहाने भरलेली टीम असून ती उत्तम कामगिरी करणारी आहे आणि रॉयल स्टॅगच्या ब्रँड तत्त्वज्ञानाशी अचूकपणे जुळणारी आहे- “हे तुमचे आयुष्य आहे. भरभरून जगा.” आपला दर्जा आणि या जंटलमेन्स गेमप्रति असलेले प्रेम यांच्याद्वारे रॉयल स्टॅग भारतभरातील क्रिकेटप्रेमींचे लाडके असलेल्या या महान क्रिकेटपटूंसाठी पाया रचण्यासाठी सज्ज आहे.
क्रिकेट हे रॉयल स्टॅगच्या ब्रँड संवादाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. मागील काही वर्षांत ब्रँडची जगातील सर्वोच्च क्रिकेटपटूंसोबतची आणि टीम्ससोबतची भागीदारी यांमुळे देशभरातील क्रिकेटप्रेमींसोबत त्यांचा संवाद वाढला आहे. यावर्षी रॉयल स्टॅग मनाने व उत्साहाने खेळणाऱ्या आणि आपल्या यशाचा आनंद स्टाइलमध्ये, दिमाखदार पद्धतीने साजरा करणाऱ्या टीमसोबत आपल्याला जोडून या गेमला मानवंदना देत आहे, कारण हे ब्रँडच्या मुलभूत तत्त्वांशी अचूकपणे जोडले जाणारे आहे.
या प्रायोजकत्वाबाबत बोलताना पर्नोद रिकार्ड इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी कार्तिक मोहिंद्रा म्हणाले की,“क्रिकेटच्या चाहत्यांच्या संपूर्ण पिढीसाठी वेस्ट इंडिजने एक अदभुत बुद्धिमत्ता, सकारात्मक दृष्टीकोन आणि अमर्याद स्टाइल आणली आहे. मागील दशकभराच्या कालावधीत टीमने प्रचंड आत्मविश्वास कमावला आहे आणि त्यांच्याकडे असे खेळाडू आहेत ज्यांनी कॅरेबियनना टी२० वर्ल्ड कप जिंकण्यास मदत केली. रॉयल स्टॅगने मागील काही वर्षांत या गुणांचा गौरव केला आहे. त्यामुळे ही भागीदारी आणखी खास ठरली आहे. या टीममधील अनेक खेळाडूंचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत, कारण टी-२० क्रिकेटमध्ये त्यांनी खळबळ उडवून देणारे परफॉर्मन्स दिलेले आहेत. रॉयल स्टॅग हे मागील जवळपास दोन दशकांपासून उत्साहाचे आणि मर्यादित ओव्हर क्रिकेटच्या धडाकेबाज अॅक्शनचे दुसरे नाव आहे. सध्या सुरू असलेल्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा अधिकृत प्रायोजक होत असताना आम्ही या खेळाच्या जादूशी आमची भागीदारी कायम ठेवत आहोत.”
क्रिकेट वेस्ट इंडिजचे कमर्शियल संचालक डॉमिनिक वॉर्न म्हणाले की, “आम्हाला रॉयल स्टॅगसोबत भारतात आमच्या वेस्ट इंडिज मेन्स टीमसाठीच्या या नवीन भागीदारीबाबत खूप आनंद होत आहे. भारतातील आणि जगभरातील चाहत्यांनी कायमच वेस्ट इंडिजच्या टीम्स आणि खेळाडूंना प्रचंड प्रेम व गौरव दिला आहे. २०२२ मध्ये कॅरेबियन टूर भारतात येणार असून त्यामुळे भारतासोबत अटीतटीचे सामने खेळता येतील. त्यामुळे आमच्यासोबत अॅक्शन पॅक्ड ओडीआय आणि टी २० मालिकांसाठी भागीदारी केल्याबद्दल आम्ही खूप उत्साहात आहोत.“






