राज्य स्पर्धेत नाशिकचे खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा – रवींद्र मेतकर, ज्येष्ठ क्रीडा संघटक

नाशिक : १७ ते २० फेब्रुवारी, २०२२ दरम्यान पुणे येथे वरीष्ठ गटाच्या महाराष्ट्र राज्य ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या पुरुष आणि महिला संघाची निवड करण्यासाठी नाशिक जिल्हा ज्युडो असोसिएशनच्या वतीने नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, येथे नाशिक जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या निवड चाचणी मध्ये जिल्ह्यातील ३२ पुरुष खेळाडूंनी तर १९ महिला खेळाडूंनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. .
या स्पर्धेत पुरुषामध्ये ६० किलो वजनी गटात सतीश ठाकरेने प्रथम क्रमांक मिळविला. तर ६६ किलो वजनी गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू सुहास वैदयने आपल्या दर्जाला साजेशा खेळ करून प्रथम क्रमांक मिळविला. ७३ किलो वजनी गटात राष्ट्रीय खेळाडू सुहास मैंदने या गटात विजेतेपद पटकावले
महिलामध्ये राष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक प्राप्त केलेली खेळाडू विद्या लोहारने ५२ किलो गटात विजेतेपद पटकावले तर ७० किलो गटात दिव्या कर्डेल प्रथम क्रमांक मिळविला.
या वेळी महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनचे खजिनदार आणि नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशनचे जेष्ठ संघटक रवींद्र मेतकर, स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ इंडियाचे (साई) कोच विजय पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलतांना रवींद्र मेटकर यांनी सांगितले की सन १९७५-८० पासून ते आत्तापर्यंत नाशिकच्या जुडोकांनी ( खेळाडूंनी) राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. या संघामध्ये निवड झेलल्या खेळाडूंनीही याआधी राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे तर सुहास वैद्य २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे पुणे येथे होणाऱ्या स्पर्धेतही हे खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्युदो प्रशिक्षक योगेश शिंदे. स्वप्नी; शिंदे, भगवान दराडे, नामदेव कचरे यांनी परिश्रम घेतले.
या निवड झालेल्या खेळाडूंचें नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव आणि जेष्ठ संघटक रत्नाकर पटवर्धन, नाशिकच्या जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पल्लवी धात्रक- सानप, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, विजय पाटील आदिंनी अभिनंदन केले आणि या सर्व खेळाडूंना पुणे येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी शुभेछया दिल्या.






