नाशिक – नाशिक जिल्हा द्राक्ष पिक घेण्यात देशात अग्रेसर असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे संघटन व द्राक्ष पिकाची मुल्यवर्धित साखळी निर्माण करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात येणार आहे. आराखड्याचे नियोजन करण्यासाठी 16 जुलै 2019 रोजी दुपारी 3 वाजता द्राक्ष बागायतदार संघ कार्यालय,ओझर ता. निफाड येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी उत्सुक व उपक्रमशील शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नाशिक व द्राक्ष बागायतदार संघ यांचेमार्फत करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





