एकपात्री प्रयोग सादर करतांना वेगवेगळे आवाज काढता येणे गरजेचे :अनिल सोनार, नाशिकमध्ये स्टॅन्ड अप कॉमेडी स्पर्धेचा शुभारंभ

Jul 16, 2019

नाशिक – सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा संचालनालयातर्फे आयोजित पु.ल.देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त रावसाहेब थोरात सभागृह, गंगापुररोड नाशिक येथे स्टॅन्ड अप कॉमेडी स्पर्धेचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी स्पर्धेचे परिक्षक म्हणून अनिल सोनार, डॉ.संजय कळमकर, शाम राजपुत, सांस्कृतिक कार्य विभागाच्या संचालक मिनल जोगळेकर, सोनी टिव्हीचे सचिन मोटे, गोस्वामी, के.टी.एच.एम.कॉलेजचे प्राचार्य डॉ.गायकवाड आदी उपस्थित होते.
श्री. अनिल सोनार म्हणाले, एकपात्री प्रयोग सादर करतांना पु.ल.देशपांडे यांचे साहित्य वाचणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी ज्याप्रमाणे त्यांच्या पात्रांना वेगवेगळे आवाज दिले आहेत त्याप्रमाणे आवाजाची पट्टी ही खालीवर करता येणे गरजेचे आहे. पुरुषाचा आवाज, बायकी आवाज, म्हाताऱ्या माणसाचा आवाज असे वेगवेगळे आवाज काढता येणे गरजेचे आहे. तसेच शब्दांचा भरणा आपल्या जवळ असणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती जोगळेकर म्हणाल्या, राज्यात 36 केंद्रावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असुन स्टॅन्ड अप कॉमेडी स्पर्धा शुभारंभाचा पहिला मान हा नाशिककरांना मिळाला. पु.ल.देशपांडे हे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे त्यांच्या साहित्यातले काही जरी घेतलं, तरी ते आपण सादर करु शकु, इतकी ताकद त्यांच्या शब्दांमध्ये असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या स्पर्धेत शुभम पाठक, आगम मुथा, श्रावणी जाधव, तेजश्री वाघ, राजन पवार,उमेश सोनवणे, सिद्धेश काकड, शर्वरी कदम, दर्शना माळी, रचना चिंतावार, रिद्धी भावसार, अर्चना गांगुर्डे, निकीता लोंढे, महिमा बोरसे, दशरथ भगत, समृद्धी बनकर, साक्षी सिरसाठ, प्रथमेश जाधव, संहिता देशपांडे, अथर्व निकम, बागेश्री पारनेरकर, अस्मिता साखरे, महेश खैरनार या विविध क्षेत्रातील 24 स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत अर्चना आकाश गांगुर्डे हिला प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहिर करण्यात आले असुन तिला प्रशस्तीपत्रक व रुपये 20 हजाराचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच उपविजेता म्हणून उमेश राजेंद्र सोनवणे याला प्रशस्तीपत्रक व रुपये 15 हजाराचा धनादेश देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने श्रोतावर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी केले. तर आभार सांस्कृतिक कार्य विभागाच्या संचालिका मिनल जोगळेकर यांनी मानले

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News