नाशिकच्या अपोलो हॉस्पिटल्समध्ये यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमुळे ४२ वर्षीय व्यक्तीला मिळाले जीवनदान

Jul 19, 2019

नाशिक : नाशिकच्या अपोलो हॉस्पिटल्समध्ये नुकतीच यकृत प्रत्यारोपणाची शास्त्रकिया यशस्वीपणे पार पाडली गेली. ब्रेन डेड दात्याच्या यकृताच्या प्रत्यारोपणाची ही अपोलो हॉस्पिटल्स, नाशिकमध्ये करण्यात आलेली अशाप्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया आहे.  पोस्ट-ऑपरेटिव्ह मेकॅनिकल व्हेंटीलेशनची गरज भासू न देता ऑपरेटिंग टेबलवरच केलेले एक्स्ट्युबेशन (एन्डोट्रशियल ट्यूब काढून टाकणे) हा या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा भाग होता.  यामुळेच रुग्णाला यशस्वी यकृत प्रत्यारोपणानंतर १० दिवसात घरी पाठवले गेले.रुग्ण पुरुष ४२ वर्षांचा असून त्यांना नॉन-अल्कोहोलिक स्टेटॉहेपॅटिटिस (एनएएसएच) मुळे उद्भवणारा यकृताचा गंभीर आजार (सीएलडी) झालेला होता. यामध्ये यकृतामध्ये जमा झालेल्या चरबीमुळे यकृताला सूज येते व त्याचे गंभीर प्रमाणात नुकसान होते. यामुळे यकृताचे कामकाज मंदावते, ज्यामुळे कावीळ, पोटात पाणी होणे, आतड्यांमध्ये रक्तस्त्राव अशा समस्या सुरु होतात. या रुग्णाच्या बाबतीत पोर्टल वेनस थ्रोम्बोसिस म्हणजेच आतड्यांमधून यकृताकडे रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीमध्ये गाठ निर्माण झाल्यामुळे आजार अधिकच गुंतागुंतीचा व गंभीर बनला होता.

नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल्सचे लिव्हर ट्रान्सप्लान्ट सर्जन, कन्सल्टन्ट डॉ. विक्रम राऊत यांनी सांगितले, “६ जून २०१९ रोजी ब्रेन डेड  दात्याकडून मिळालेल्या यकृताच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.  यकृत प्रत्यारोपणाच्या बाबतीत दीर्घकाळपर्यंत पोस्टऑपरेटिव्ह मेकॅनिकल व्हेंटिलेशन ही सगळीकडे केली जाणारी प्रक्रिया असली तरी आम्ही टेबलवरच रुग्णाला एक्स्ट्युबेट केले.  एक्स्ट्युबेशनच्या प्रक्रियेसाठी शस्त्रक्रियेच्या आधी रुग्णाचे काळजीपूर्वक विश्लेषण व निवड करणे आवश्यक आहे. आधी एक्स्ट्युबेशन करण्याचे विविध फायदे असतात, शस्त्रक्रियेनंतर संसर्गाचा धोका कमी असतो, प्रत्यारोपित भागामध्ये रक्ताभिसरण सुधारते व शस्त्रक्रियेनंतर अगदी कमी खर्चात रुग्ण लवकर बरा होतो.  या प्रकरणात शस्त्रक्रियेनंतर काहीही अडचण आली नाही आणि १० दिवसात रुग्ण मुंबईला आपल्या घरी परत गेला. फॉलो-अप्समध्ये रुग्णाची तब्येत सातत्याने सुधारत असल्याचे दिसून आले व आता हा रुग्ण आपले सर्वसामान्य जीवन जगत आहे.” 

नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल्सचे एचपीबी अँड लिव्हर ट्रान्सप्लान्ट सर्जरीचे कन्सल्टन्ट डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले, “वैद्यकीय शास्त्रामध्ये यकृत प्रत्यारोपणाच्या बाबतीत अनेक सुधारणा घडून येत आहेत.  मोठ्या महानगरांमध्ये आज ही सुविधा सहज उपलब्ध होत आहे. भारतात दरवर्षी १५०० पेक्षा जास्त यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जात असल्या तरी प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे.  यकृत प्रत्यारोपणासाठी सुसज्जित पायाभूत सोयीसुविधा, इन-हाऊस रक्तपेढी व शस्त्रक्रियेच्या आधी आणि नंतरच्या विविध उपचारांसाठी भरपूर टीमवर्क आवश्यक असते.  छोट्या शहरांमध्ये देखील हे जीवन वाचवू शकणारे उपचार पर्याय उपलब्ध असणे आवश्य आहे जेणेकरून शेवटच्या टप्प्यावरील यकृत आजाराने ग्रस्त रुग्णांना त्यांचे लाभ घेता येतील, त्यांना जागतिक दर्जाची उपचार सेवा मिळवण्यासाठी फार लांब प्रवास करावा लागणार नाही.”   

अपोलो हॉस्पिटल्सची अवयव प्रत्यारोपण टीम ही त्यामध्ये समावेश असलेल्या देशातील काही निष्णात प्रत्यारोपण सर्जन्ससाठी नावाजली जाते, या सर्जन्सना अवयव प्रत्यारोपण क्षेत्रातील कामाचा दीर्घ अनुभव आहे.  यामुळेच ऑपरेशन टेबलवर एक्स्ट्युबेशन करण्यात आले ज्यामुळे रुग्णाची तब्येत लवकर सुधारली.  ट्रान्सप्लान्ट टीमला विविध क्षेत्रातील विशेषज्ञांचे तसेच ट्रान्सप्लान्ट कॊ-ऑर्डिनेटर्स, सामाजिक कार्यकर्ते, मानसोपचारतज्ञ आणि भूलतज्ञ अशा सपोर्ट स्टाफचे सहकार्य लाभले.  अपोलो हॉस्पिटल्समध्ये शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण सातत्याने केले जात असते, ज्यामुळे रुग्णांना विनासायास, वेदनामुक्त शस्त्रक्रिया व त्यानंतर प्रकृतीत वेगवान सुधारणेचे लाभ मिळतात.  अपोलो हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना विविध उपचार पर्याय उपलब्ध आहेत जे जागतिक पातळीवर उपलब्ध असलेल्या उपचारांच्या तोडीचे आहेत.

 

नाशिकच्या अपोलो हॉस्पिटल्सचे कन्सल्टन्ट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शरद देशमुख यांनी सांगितले, “एनएएसएच सहित यकृताचे इतर आजार हे देशातील दहा प्रमुख आजारांपैकी आहेत ज्यामुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेल्या यकृताच्या आजारांमुळे आणि यकृताच्या कर्करोगामुळे दरवर्षी भारतात २ लाखांहून जास्त लोक मृत्युमुखी पडतात.  भारतात लिव्हर सिर्र्होसीसचे एक-तृतियांशपेक्षा जास्त रुग्ण हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा यकृत पूर्णपणे निकामी होण्याच्या शेवटच्या टप्प्याला पोहोचलेले असतात. बहुतांश यकृत आजारांसाठी मद्यपान कारणीभूत असते या सर्वसाधारण समजुतीच्या अगदी विरुद्ध वास्तविक परिस्थिती आहे.  फक्त ३०% यकृत आजारांचे कारण मद्यपान हे असते. बहुतांश वेळा यकृत निकामी होण्याचे प्रमुख कारण हिपॅटायटिस बी आणि सी यासारखे संसर्ग असतात. त्याचबरोबरीने मधुमेही व अतिलठ्ठ लोकांच्या बाबतीत यकृतामध्ये अति चरबी साठलेली असणे आणि इतर काही बाबी देखील याला कारणीभूत असतात. ऑटोइम्युन हिपॅटायटिस आणि विलसन्स डिजीज ही यकृत निकामी होण्याची सर्वसाधारण कारणे जरी नसली तरी त्यांच्या अनेक केसेस आम्ही पाहतो.”  

नाशिकच्या अपोलो हॉस्पिटल्सचे सीओओ डॉ हरीश मेनन यांनी सांगितले, “ब्रेन डेड  व्यक्तीच्या शरीरातून सुस्थितीत असलेल्या अवयवांच्या इतर गरजू व्यक्तींच्या शरीरामध्ये प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया लक्षणीय प्रमाणात होतात व त्यांच्यामध्ये रुग्णांचे जीव वाचवण्याची क्षमता असते.  यामुळे रुग्णांना पुन्हा एकदा सर्वसामान्य जीवन जगण्याची सुवर्णसंधी मिळते. अशाप्रकारच्या अवयव दानाबद्दल जागरूकता वाढवणे गरजेचे आहे, त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते.  नाशिकच्या अपोलो हॉस्पिटल्समध्ये यशस्वीपणे करण्यात आलेली यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ही अशाच प्रकारच्या जीवनदायी प्रक्रियेचे आदर्श उदाहरण आहे.”

अपोलो हॉस्पिटल्स 

१९८३ साली डॉ. प्रताप रेड्डी यांनी पुढाकार घेत अपोलो हॉस्पिटल्स हे भारतातील पहिले कॉर्पोरेट रुग्णालय चेन्नई येथे सुरु केले.  तेव्हापासून अपोलो हॉस्पिटल्स हे भारतातील हृदय उपचारांचे सर्वात मोठे केंद्र बनले, याठिकाणी आजवर १६०००० पेक्षा जास्त हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.  अपोलो हॉस्पिटल्स हे जगातील सर्वात मोठे कॅन्सर उपचार प्रदान करणारे खाजगी रुग्णालय आहे व याठिकाणी जगातील अग्रणी सॉलिड ऑर्गन ट्रान्सप्लांट प्रोग्रॅम चालविला जातो.हा आशियातील सर्वात मोठा व सर्वाधिक विश्वासाचा आरोग्यसेवा प्रदान करणारा समूह आहे, यामध्ये ७१ रुग्णालयांमध्ये १०००० पेक्षाही जास्त बेड्स, ३,००० फार्मसीज, ९० पेक्षा जास्त प्रायमरी केअर अँड डायग्नोस्टिक क्लीनिक्स, ११० पेक्षा जास्त टेलिमेडिसिन सेंटर्स व ८० पेक्षा जास्त अपोलो म्युनिक इन्शुरन्सच्या शाखा सामील आहेत, ज्या देशातील विविध भागांमध्ये कार्यरत आहेत.

आरोग्य विमा सेवा, ग्लोबल प्रोजेक्ट्स कन्सल्टन्सी क्षमता, १५ पेक्षा जास्त मेडिकल एज्युकेशन सेंटर्स, ग्लोबल क्लिनिकल ट्रायल्स, एपिडेमीओलॉजिकल संशोधन, स्टेम सेल व जेनेटिक संशोधनावर विशेष लक्ष केंद्रित करणारे रिसर्च फौंडेशन या सर्वांच्या साथीने अपोलो हॉस्पिटल सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करते व उपचार क्रांतीमध्ये अग्रेसर आहे.  महत्त्वपूर्ण गुंतवणूक करत भारतातील चेन्नईमध्ये त्यांनी आशिया, आफ्रिका व ऑस्ट्रेलियातील पहिले प्रोटॉन थेरपी सेंटर सुरू केले आहे.  दर चार दिवसात अपोलो हॉस्पिटल्स समूह एक मिलियन लोकांच्या जीवनाला स्पर्श करतो, प्रत्येक व्यक्तीला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सेवा मिळाव्यात हा त्यांचा उद्देश आहे.  

भारत सरकारने अपोलो हॉस्पिटल्सच्या सन्मानार्थ स्टॅम्प प्रकाशित केला आहे.  अशाप्रकारचा सन्मान मिळवणारी ही पहिलीच आरोग्य संस्था आहे. अपोलो हॉस्पिटल्सचे चेअरमन डॉ. प्रताप सी रेड्डी यांना २०१० साली पद्म विभूषण हा सन्मान बहाल करण्यात आला.  तीस वर्षांहून अधिक काळ अपोलो हॉस्पिटल्स समूहाने उपचारांमध्ये नवे शोध, जागतिक दर्जाच्या क्लिनिकल सेवा, आधुनिक तंत्रज्ञानात सातत्यपूर्ण नेतृत्व केले आहे.  आधुनिक उपचार सेवा व संशोधनासाठी आमची रुग्णालये जगातील सर्वोत्कृष्ट रुग्णालयांच्या पंक्तीत गणली जातात.

अधिक माहिती व ताज्या घडामोडींसाठी कृपया येथे लॉग ऑन करा – www.apollohospitals.com 

प्रसिद्धीसाठी संपर्क 

Dr Mangesh –  9860059917

Mr. Kaivalya- 9561397111

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News