नाशिक दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या विकंलागंजन सशक्तीकरण विभागाने 2019 साठीच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविले आहेत. या अर्जातच महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अपंग कल्याण राज्य पुरस्काराची निवड करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार योजनेचा तपशिल व अर्जाचे नमुने www.disabilityaffairs.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध असुन दिव्यांगाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती/स्वयंसेवी संस्थांनी आपल्या कार्याविषयी संक्षिप्त माहिती 150 ते 200 शब्दांत इंग्रजीमध्ये तयार करुन अर्जास जोडावी.
राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरुप उत्कृष्ट कर्मचारी स्वयंउद्योजक दिव्यांग व्यक्ती, उत्कृष्ट नियुक्ती अधिकारी आणि सेवा योजन अधिकारी किंवा संस्था, दिव्यांग व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्ती व संस्था, प्रतिथ यश व्यक्ती, दिव्यांग व्यक्तीचे जीवनमान सुधारणाच्या उद्देशाने केलेला उत्कृष्ट संशोधन/उत्पादन/निर्मिती, दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी अडथळा विरहीत वातावरण निर्मिती करणारे कार्यालय/संस्था, दिव्यांग व्यक्तींना पुनर्वसन सेवा पुरविणारा उत्कृष्ट जिल्हा, राष्ट्रीय दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे कार्य करणारी राज्य संस्था, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रौढ दिव्यांग व्यक्ती, उत्कृष्ट कार्य करणारे दिव्यांग बालक, उत्कृष्ट बेल छापखाना, उत्कृष्ट सहजसाध्य संकेतस्थळ, दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहीत करणारे उत्कृष्ट राज्य, क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी दिव्यांग व्यक्ती याप्रमाणे असेल.
दिव्यांगाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्थानी वेबसाइटवरुन अर्ज प्राप्त करुन घेऊन राज्य/राष्ट्रीय पुरस्कारासाठी परिपूर्ण प्रस्ताव विहीत नमुन्यात अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रासह तीन प्रतीत जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांचेकडे 10 ऑगस्ट, 2019 पूवी्र सादर करावेत, तदनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही असे आवाहन डॉ.व्ही.डी.गर्जे जिल्हा समाज कल्याण अधिकारी , जिल्हा परिषद नाशिक यांनी केले आहे.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...




