ब्रीज, भारताच्या खेळाडूंना अनिल पाध्ये, आनंद सामंत यांचे मार्गदर्शन

Apr 26, 2022

नाशिक दिनांक २६ एप्रिल :- ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन यांच्या वतीने केन्सिंगटन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नाशिक येथे ब्रीज या खेळाच्या भारतीय महिला संघाच्या खेळाडूंसाठी चार दिवस शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी केन्सिंगटन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे संचालक विक्रांत मते यांनी या शिबीरला भेट दिली, आणि खेळाडूंना ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या आशियायी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी बोलतांना त्यांनी सांगीतले की  केन्सिंगटन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीने विवीध खेळांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आणि ब्रीज या खेळांला तर आमचे कायमच सहकार्य राहीलेले आहे,  आणि या पुढेही ब्रीजच्या सर्व उपक्रमांना कायमच सहकार्य दिले जाईल असे सांगितले.

चार दिवस सुरू असणाऱ्या या शिबीरामध्ये भारतीय संघातील खेळाडू पूजा बात्रा (दिल्ली), वासंती शहा( मुंबई), भारती डे ( कलकत्ता), आशा शर्मा (दिल्ली), अलका क्षीरसागर( पुणे), उषा काब्रा (मुंबई),  रिचा श्रीराम (दिल्ली),  आणि मीनल ठाकूर(मुंबई) या खेळाडूंचा समवेश आहे.

या संघाचे प्रशिक्षक म्हणून आनंद सामंत, विनय देसाई आणि अनिल पाध्ये यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आजच्या सत्रात जागतिक ब्रीज स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून देणारे अनिल पाध्ये आणि आनंद सामंत यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की  खेळ खेळतांना येणाऱ्या विवीध परिस्थीतीनुसार आपण आपल्या डावपेचाची आखणी काशी करायची, आपला सहकारी जोडीदार याच्याशी समन्वय राखण्यासाठी आपला खेळ कश्या प्रकारे असायला हवा या बाबतीत मार्गदर्शन केले.

भारताच्या संघाला अश्या अनुभवी प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे हा भारताचा महीला संघ ऑगस्ट मध्ये आयोजीत १९ व्या अशियायी स्पर्धेमध्ये (Asian games) चांगली कामगिरी करतील असा विश्वास ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया चे सरचिटणीस आनंद सामंत यानी व्यक्त केला. या शिबीरच्या आयोजनासाठी महाराष्ट्र ब्रीज असोसियशनचे  सरचिटणीस हेमंत पांडे यांचे मोलाचे मार्गरदर्शन आणि सर्व प्रकारचे सहकार्य मिळत आहे. तसेच  केन्सिंगटन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सकडून सर्व प्रकारचे सहकार्य लाभले आहे.

उद्या दिनांक २७ ते २९ एप्रिल दरम्यान नाशिक येथेच जूनियर गटाच्या खेळाडूंचेही शिबीर आयोजीत करण्यात आले आहे अशी माहीती या उपक्रमाचे प्रमुख हेमंत पांडे यांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News