ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन आणि नाशिक ब्रीज असोसि एशन यांच्या वतीने ज्यूनीयर गटाच्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेचे नाशिक येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला काल दिनांक २७ एप्रिल रोजी सुरवात झाली.

या स्पर्धेत १६ वर्षे, २१ वर्षे, २६ वर्षे आणि ३१ वर्षे अश्या चार गटात या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी खेळल्या गेलेल्या सहा राऊंड नंतर २१ वर्षे गटात प्रज्वल आणि तिलकराज चौधरी यांनी सर्वात जास्त ७०.०५ गुण मिळवून या गटात आघाडी घेतली आहे. तर जीवन आनंदमय विक्रमान आणि जी. यु. काव्या यांनीही चांगला खेळ करून सहा राऊंड नंतर ६६.४८ गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर तरँल रॉड्रीगेस आणि एस. दिनेश बाबू यांनीही चांगला खेळ करुन ६३.३६ गुणासह तिसऱ्या स्थानावर आहेत.
३१ वर्षे वयोगटात सागणिक रॉय आणि सायंथन कुशारी यांनी बहारदार खेळ करून सहा राऊंड नंतर ५६. ११ गुण मिळवत पाहिले स्थान तर आर्या चौधरी आणि सौमदीप घोष या जोडीने
४३. ८३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आपले स्थान ठेवले आहे. सिक्रीटीक सतीश आणि कनिष्क या जोडीने त्याखालोखाल सुंदर खेळ करून ४५. ९४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
१६ वर्षे गटात तीर्थराज चौधरी आणि निचिकेत मुथू स्वामी यांनी बहारदार खेळ करून पाच राऊंड नंतर ५६. ११ गुण मिळवत आघाडी घेतली आहे, तर त्याखालोखाल सिक्रीटीक सतीश मोहन आणि किनिस्का या जोडीने ४५. ९४ गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
या निकालाच्या आधारे २४ खेळाडूंची निवड करण्यात येणार असून या २४ खेळाडूंचे सहा संघ तयार करण्यात येणार असून उद्या त्यांच्यामध्ये टीम इव्हेंट च्या स्पर्धा खेळविल्या जातील अशी माहिती या स्पर्धेचे आयोजन प्रमुख हेमंत पांडे यांनी दिली.






