अमेरिकेतील आयकॉनिक सायकल ब्रँड ट्रेक बायसिकल नाशिकमध्ये दाखल

Jul 20, 2019

रस्ते, पर्वत आणि दोन्ही ठिकाणांसाठी अनुकूल अशा सायकल, सायकलींचे सर्वोत्तम दर्जाचे सुटे भाग,अॅक्सेसरीज आणि रायडिंग गिअर आता उपलब्ध होतील नाशिकमधल्या श्रीरंगनगरच्या लुथरा एजन्सीजमध्ये

नाशिक : जगभरातील आघाडीची सायकल उत्पादक कंपनी ट्रेक बायसिकल यांनी महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या नाशिकमध्ये आपले दालन सुरू करण्याची घोषणा केली आहे. बाजारपेठेत उत्पादन दाखल करण्याचा आनंद साजरा करण्यासाठी या ब्रँडच्या वतीने ‘ट्रेक फाउंडर्स राइड’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. नाशिक शहरातल्या रमणीय रस्त्यांवरून २५ किलोमीटर सायकलिंग करत आनंद व्यक्त करण्यासाठी १०० हून अधिक उत्साही सायकलस्वार या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. सायकलस्वारांची परस्पर ओळख होण्यासाठी तसेच सायकलिंगबद्दलच्या त्यांच्या स्फूर्तिदायक कहाण्या, तज्ज्ञांचे मोलाचे सल्ले या सगळ्यांसाठी ही सायकल फेरी हे एक व्यासपीठच ठरणार आहे.

रस्ते, पर्वत आणि दोन्ही प्रकारांतील प्रीमियम आणि सुपर प्रीमियम गटातील सायकलींसाठी ट्रेक बायसिकलने लुथरा एजन्सीज बरोबर रिटेल विक्रीसाठी भागीदारी केली आहे. ट्रेकने आपल्या बॉनट्रॅजर या ब्रँडअंतर्गत येणारे सायकलचे सुटे भाग, अॅक्सेसरीज, मर्चंटाइज आणि रायडिंग गिअर यांची विशाल श्रेणी उत्साही ग्राहकांना आता नाशिकमध्‍ये उपलब्ध होणार आहे.

भारत आणि नाशिकातील सायकल संस्कृती तसेच या ब्रँडबद्दल ट्रेक बायसिकलचे भारतासाठीचे कंट्री मॅनेजर नवनीत बंका म्हणाले, ”जगातील तंत्रज्ञानदृष्ट्या सर्वाधिक अद्ययावत सायकल बाजारपेठेत घेऊन येण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि नाशिकमध्ये आमचे भागीदार लुथरा एजन्सीज त्यांचे रिटेल विक्रेते असतील. नाशिक भौगोलिकदृष्ट्या उंचीवर असल्यामुळे इथले हवामान यामुळे उत्साही सायकलस्वार वर्षभर सायकलचा आनंद लुटू शकतात. आता ट्रेकच्या विविध ब्रँडची उत्पादने शहरात उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांना वेगळ्या आणि दर्जेदार उत्पादनांचा आगळावेगळा अनुभव घेता येईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.”ट्रेकसोबत केलेल्या भागीदारीबाबत नाशिकच्या लुथरा एजन्सीजचे डीलर पार्टनर राज लुथरा म्हणाले,”आम्ही ट्रेक कुटुंबाचा भाग झालो आहोत याचा आम्हाला आनंद आहे. गेल्या काही वर्षांत एक क्रीडा प्रकार आणि आनंदासाठी म्हणून सायकलिंग करण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वातावरणाच्या रक्षणासाठी पूरक प्रयत्न व स्वत:चे आरोग्य राखण्यासाठीचा व्यायाम प्रकार म्हणून लोकांनी सायकलिंगची सवय लावून घ्यायला सुरुवात केली आहे. या उत्साही सायकलस्वारांच्या बायकिंगसंबंधी सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

”उत्साही सायकलस्वारांना एकत्र आणणे, समाजाच्या एकत्रीकरणाला हातभार लावणे आणि सर्वसमावेशक ब्रँड अनुभव देण्याच्या आमच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी ‘ट्रेक फाउंडर्स राइड’सारखा उपक्रम राबवण्यात येत आहे,” असेही त्यांनी सांगितले.

गेल्या चार दशकांत संशोधनाला चालना देण्याची परंपरा राखणा-या ट्रेक कंपनीचा तंत्रज्ञानदृष्ट्या सर्वांत अद्ययावत सायकल उत्पादक कंपनी असा जगभर नावलौकिक आहे. १९९०मध्ये सर्वांत पहिल्यांदा कार्बन सायकलचे उत्पादन करणाऱ्या ट्रेक कंपनीने, अजूनही व्यवसायातील आघाडीचे स्थान राखले आहे त्याचे कारणही तसेच आहे. कंपनी सामान्य सायकलस्वारासाठी तयार होणाऱ्या सायकलसाठी अवकाशात व फॉर्म्युला वन रेसिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करते.

जगभरातील १०० देशांत रिटेल दालनांत कंपनीच्या सायकल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. भारतातील ट्रेकच्या सायकलींची किंमत ३२,००० रुपयांपासून सुरू होते. तर ग्राहकाच्या गरजेनुसार व त्याच्या आवडीनुसार कार्यक्षमता असणाऱ्या सायकलीची किंमत २० लाख रुपयांपर्यंत असू शकते. ट्रेक फॅक्टरी रेसिंग टीमचा सदस्य असलेल्या व्यावसायिक सायकलस्वारांकडून ट्रेक कंपनी आपल्या सर्वांत महागड्या सायकलींसाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाची आणि सायकलींच्या कार्यक्षमतेची तपासणी करून घेते. आपल्या बॉनट्रॅजर या ब्रँडअंतर्गत सायकलींचे सुटे भाग, अॅक्सेसरीज, मर्चंटाइज आणि रायडिंग गिअरची मोठी श्रेणीही ग्राहकांना उपलब्ध करून देते. प्रत्येक नव्या ट्रेक सायकलसोबत ग्राहकाला उद्योगातील सर्वोत्तम वॉरंटी आणि लॉयलिटी प्रोग्रॅम दिला जातो, ज्यामध्ये सायकलच्या फ्रेमची आजीवन वॉरंटी आणि अद्वितीय अशी विनाअट बॉनट्रॅजर गॅरंटीचा समावेश असतो.

ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन ही सायकल खरेदी त्यांना परवडावी या हेतूने ट्रेकने एचडीएफसी बँक लिमिटेडशी भागीदारी केली असून त्याअंतर्गत एका वेगळ्या ग्राहक अर्थपुरवठा योजनेनुसार शून्य डाऊनपेमेंट आणि नो-कॉस्ट ईएमआय हे फायदे मिळू शकतात. भारतातील कंपनीच्या अधिकृत रिटेल दालनातून ट्रेक उत्पादनांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाच ही सवलत मिळणार आहे.

भारतातील एकूण सायकलिंग बाजारपेठ १६.३ दशलक्षसायकली दरवर्षी एवढी आहे. ट्रेक सुपर-प्रीमियम गटात उत्पादने विकते, ज्यामध्ये आता साधारणपणे वर्षाला अंदाजे ३०,००० सायकली विकल्या जातात आणि गेल्या ५ वर्षांत या गटात २० टक्क्यांच्या सीएजीआरची नोंद झाली आहे.

ट्रेकचे सध्या भारतात २७,००० हून अधिक ग्राहक आहेत आणि २०१८ मध्येच कंपनीने भारतात उपकंपन्या सुरू केल्या आहेत. जगभरातील तंत्रज्ञानदृष्ट्या सर्वांत अद्ययावत बायसायकलिंग कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या ट्रेकच्या वतीने आतापर्यंत रस्ते, पर्वत आणि दोन्ही अशा प्रकारांत ४० हून अधिक मॉडेल्स सादर केली आहेत. तसेच ट्रेक आणि बॉनट्रॅजर या ब्रँडच्या माध्यमातून सुटे भाग, अॅक्सेसरीज, मर्चंटाइज आणि रिडिंग गिअरचीही मोठी श्रेणी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. ट्रेक आणि बॉनट्रॅजर उत्पादने देशातील ३२ शहरांतील ३४ दालनांमध्ये उपलब्ध असून या शहरांच्या यादीत दिल्ली, हैदराबाद, मुंबई, नाशिक, लुधियाना, गाझियाबाद, चेन्नई, बेंगळुरू, इंदूर, हल्दवानी, विशाखापट्टणम, मंगळूर, गोवा, नागपूर, पटियाला, ठाणे, पुणे, अहमदाबाद, जालंधर, रायपूर, श्रीनगर, कोल्हापूर, कोलकाता, भोपाळ, विजयवाडा, सिलिगुडी, लखनौ, भुवनेश्वर, म्हैसूर, जयपूर, देहराडून, नांदेड या शहरांचा समावेश आहे.  

 अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या https://www.trekbikes.com 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News