राष्ट्रीय मिनी आणि सबज्युनिअर टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धा ; महाराष्ट्राला सहापैकी चार विजेतेपद तर दोन उपविजेतेपद

May 11, 2022

खेळाडूनी मेहनत करून आपल्या राज्याचे आणि देशाचे नांव उंचवावे- अॅडव्होकेट राहुल ढिकले – आमदार, नाशिक पूर्व

नाशिक  : नाशिक  जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन, अखिल भारतीय मराठा महासंघ आणि अस्मिता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल, आग्रा रोड, पंचवटी, नाशिक येथील इनडोअर हॉलमध्ये २३ व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल अजिंक्यपद  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची मोठ्या उत्साहात सांगता झाली.

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानी सहापैकी चार गटात विजेतेपद मिळवून चौहेरी यश संपादन केले. तर दोन गटात उपविजेतेपद मिळविले.

या स्पर्धेत मिनी गटात महाराष्ट्र संघाने अंतिम लढतीत गुजराथ संघावर २-० असा विजय मिळवून विजेतेपद पटकावले. तर सब ज्युनिअर गटातही अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने गुजरथचा २-१ असा पराभव करून या गटाचेही विजेतेपद पटकावले. मिनी गटाच्या मिश्र दुहेरी या प्रकारात महाराष्ट्राच्या जोडीने तेलंगणचा पराभव करून विजेतेपद मिळविले. तर सब ज्यूनियर मिश्र दुहेरीमध्येही महाराष्ट्राच्या जोडीने अंतिम लढतीत आंध्र प्रदेशवर मात करून या गटाचे विजेतेपद मिळविले. गुजराथ संघाने मिनी मुलीं आणि सब ज्यूनियर मुलीं या दोन गटाचे विजेतपद मिळविले.

या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले, नाशिकच्या विभागाच्या क्रीडा उपसंचालक सौ. सुनंदा पाटील, या प्रभागाचे नगरसेवक रुची कुंभारकर, या खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड, मराठा महासंघ,नाशिकचे अध्यक्ष अशोक कदम, सचिव दिपक पाटील, टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आनंद खरे, टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव गणेश माळवे, फेडरेशनचे खजिनदार धर्मेंद्र सिंग जाडेजा, सहसचिव मुकेश बाथम, कर्नाटकचे सचिव नागेश्वर राव आणि सर्व राज्यांचे सचिव उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहा गटाच्या विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक आनंद खरे यांनी केले

यावेळी बोलतांना आमदार राहुल ढिकले यांनी सांगितले की, खेळाडूनी मेहनत करून आपल्या राज्याचे आणि देशाचे नांव उंचवावे. खेळाडूंच्या प्रगतीसाठी आमच्या कडून सर्व प्रकारचे सहकार्य दिले जात आहे असे सांगून खेळाडूंचे अभिनंदन केले.

तर क्रीडा उपसंचालक सौ. सुनंदा पाटील यांनी या भारतीय खेळाला शासनाच्या वतीने कायमच सहकार्य मिळेल असे सांगीतले.

यावेळी या खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी या खेळाच्या २३ वर्षाच्या प्रवासाबद्दल माहिती दिली.

या स्पर्धेची तांत्रिक बाजू पंच मंडळाचे प्रमुख प्रफुलकुमार बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली किरण घोलप, अक्षय गामणे, गणेश पाटील,  एस. प्रसंगी, सिद्धांत लिपणे, राहुल पेटकर, उमेश सेनभक्त, निलेश माळवे, गणेश कलंगूल, बंडू जमदडे, अभिषेक सोनवणे, तृषाली बरिया, नवाखाई पटेल आदिनी जबाबदारी सांभाळली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिपक निकम, बाळासाहेब गुरव, प्राजंल उगले, सपना गरगटे, डिपंल सोनार, प्रवीण किंगरे, जयंत चिखले, संहिल जोगदंड, पराग सोनवणे आदिनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News