मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहाय्य करावे – विभागीय आयुक्त

Jul 20, 2019

नाशिक : मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी केले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, शिवसेना पक्षाचे कार्यालय प्रमुख ॲड राहुल वाणी, भाजपा राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य नंदकुमार देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतिनिधी मनोज कोकरे आदी उपस्थित होते. श्री. माने म्हणाले, मतदार यादी अद्ययावत करतांना महत्वाच्या व्यक्तींची नांवे तपासण्यात यावी. जिल्ह्यातील मतदार यादीतील सर्व मयत मतदारांची वगळणी करुन मतदार यादी दोष विरहित आणि परिपूर्ण करण्यासाठी राजकीय पक्षांना सहकार्याचे आवाहन यावेळी विभागीय आयुक्तांनी केले.
श्री. मांढरे म्हणाले, सदर मोहिमेअंतर्गत 01 जुलै, 2019 दिनांकावर आधारित ज्या मतदारांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले आहे, अशा सर्व मतदारांची मतदार म्हणून मतदार यादीत नांव नोंदणी करणे आवश्यक असल्याने कोणीही नवमतदार मतदान करण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. बैठकीच्या शेवटी उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सध्या मतदार यादीच्या दुसऱ्या संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेची झालेली सुरुवात आहे. भारत निवडणूक आयोग दिल्ली यांचेकडील निर्देशानुसार 20 व 21 जुलै, 2019 या दोन दिवसांच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील एकूण 4720 मतदान केंद्रांवर विशेष मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. या मोहिमेअंतर्गत आज 20 जुलै रोजी विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी नाशिक शहरातील आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही मतदान केंद्रांना भेटी देऊन दुसऱ्या संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेची पाहणी केली. त्यादरम्यान त्यांनी नवमतदारांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले. यावेळी उपायुक्त रघुनाथ गावडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अरुण आनंदकर, नाशिक तहसीलदार अनिल दौंड आणि निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती सविता पठारे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News