नाशिक : आदिवासी उमेदवारांना शिपाई, लिपिक, ग्रामसेवक, तलाठी अशा वर्ग 3 व वर्ग 4 तसेच इतर पदांकरिता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षचे पूर्व तयारी करुन घेण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, कळवण येथे साडे तीन महिने कालावधीचे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण 1 ऑगस्ट 2019 पासून सुरु होत आहे. या प्रशिक्षण कालावधीत उमेदवारास दरमहा रुपये एक हजार विद्यावेतन देय राहील.
अनुसूचित जमातीच्या 18 ते 38 वर्षे वयोगटातील एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र तसेच जातीचे प्रमाणपत्र व स्वत:च्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडल्याची खाते पुस्तकाची झेरॉक्स प्रतीसह 29 जुलै 2019 रोजी सकाळी 9.30 वाजता जुने तहसिल कार्यालय आवार, नेहरु चौक, कळवण येथे मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वत: करावी लागेल. मुलाखतीस येण्यासाठी प्रवास खर्च दिला जाणार नाही. यापुर्वी प्रशिक्षण घेणाऱ्यांनी पुन्हा अर्ज करु नयेत. अधिक माहितीसाठी 02592-222973 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन, श.बा.जाधव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, कळवण यांनी केले आहे.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





