नाशिक दि.20 : संचालक , लेखा व कोषागारे, मुंबई यांनी 9 जानेवारी 2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार लेखा लिपिक, लेखा परीक्षा लिपीक व कनिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखा परिक्षक या गट क संवर्गाचे महापरिक्षा यांचेकडून घेण्यात आलेल्या परिक्षेचे निकाल www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. गुणानुक्रमे तात्पुरत्या विचाराधीन उमेदवारांची यादी संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई यांच्या www.mahakosh.gov.in या संकेतस्थळवरील Employee corner_Recruitment rule या टॅबवर उपलब्ध आहे व सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक या विभागीय कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केलेली आहे. उमेदवार त्यांच्या अर्ज नोंदणी क्रमांक (Application ID) च्या आधारे निकालाची खात्री करु शकतील.
उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी 22 जुलै ते 29 जुलै 2019 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सहसंचालक, लेखा व कोषागारे या विभागीय कार्यालयात होणार आहे. संबंधित उमेदवारांना या संदर्भात पत्रे पाठविण्यात आली आहेत. उमेदवारांना 25 जुलै पर्यंत पत्रे न मिळाल्यास त्यांनी सहसंचालक, लेखा व कोषागारे , लेखा कोष भवन, नाशिक यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. कागदपत्रे तपासणीसाठी जाहिरात नमुद सर्व कागदपत्रांच्या मुळ प्रती तसेच स्वसाक्षांकित 2 संच सोबत आणणे अनिवार्य आहे. तसेच ऑनलाईन अर्ज सादर केल्याची प्रत, प्रवेशपत्र (हॉलतिकीट), व ओळखत्र (आधारकार्ड, वाहनचालक परवाना, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड (छायाचित्र असलेले), पासपोट इ.) सोबत आणणे आवश्यक आहे, असे सहसंचालक , लेखा व कोषागारे कार्यालय, नाशिक यांनी कळविले आहे.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





