नाशिकच्या स्मित तोष्णीवालला ऑस्ट्रीया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कास्य पदक

May 30, 2022

भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा निर्धार – स्मित तोष्णीवाल

Nashik : नुकत्याच दिनांक २६ ते २९ मे, २०२२ दरम्यान ऑस्ट्रीया येथे खुल्या गटाच्या बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुरुष एकेरी. पुरुष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अश्या पाच गटांचा समावेश होता.

या स्पर्धेत महिला एकेरीमध्ये भारताचे प्रतीनिधीत्व करणाऱ्या नाशिकच्या स्मित तोष्णीवालने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून या स्पर्धेत कास्य पदक मिळविले.

या स्पर्धेत सहावे मानांकन मिळालेल्या  स्मित तोष्णीवालने अत्यंत चुरशीच्या झालेल्या पहिल्या सामन्यात जोमाने खेळ करून इंडोनेशियाच्या मुटियारा आयू पुसटासरी हिला २१-१८, २१-२३ आणि २१-१५ असे पराभूत करून चांगली सुरवात केली.

त्यानंतर दुसऱ्या सामन्यात स्मितने इंग्लंडच्या एस्टेल व्हेन लेकुवेन हीला २१-१९, २१-१४ असे पराभूत करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला.  उपउपांत्य सामन्यात स्मितने भारताच्या केयूरा मोपाती हिच्यावर २१-१० आणि २१-१३ असा सहज विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.  स्मितची उपांत्य लढत या स्पर्धेत पहिले मानांकन असलेल्या चायना तायपेच्या वेन ची हूसू हीच्या विरुद्ध झाली. या उपांत्य फेरीच्या सांमन्यातही स्मितने चांगली सुरवात करून ४-२ अश्या दोन गुणांची आघाडी घेतली. परंतु त्यानंतर  वेन ची हूसू  ने आपल्या अनुभवाच्या आधारे हा सेट २१-१४ असा जिंकून १-० अशी आघाडी मिळविली. तर दुसऱ्या सेटमध्येही ६-६ अश्या बरोबरीनंतर  वेन ची हूसू ने   हा दूसरा सेटही २१- १६ असा जिंकून हा सामना आपल्या नांवे करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या पराभवामुळे स्मितला संयुक्त रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

 या स्पर्धेत अंतिम लढतीत स्मितला पराभूत करणाऱ्या वेन ची हूसू ने दुसरे मानांकन चायना तायपेच्या लिन हसींग ताये  हीचा पराभव करून या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.   याआधी  मागील आठवड्यात पार पडलेल्या योनेक्स इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत स्मितने सुंदर खेळ करून रौप्य पदकाला गवसणी घातली होती.  या लागोपाठच्या  दोन्हीही आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चांगला खेळ करून पदक प्राप्त करणारी ती भारताची एकमेव खेळाडू ठरली आहे. कारण या स्पर्धेमध्ये भारतातर्फे सहा महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

या प्रसंगी बोलतांना स्मितने सांगितले की मी गेल्या तीन वर्षापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होत आहे. याचा मला चांगलाच फायदा होत आहे. त्यामुळे आणखी मेहनत करून भविष्यात भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचे माझे ध्येय आहे असा विश्वास व्यक्त केला.

स्मितने याआधी जानेवारी, २०२२ मध्ये सईद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेत आणि त्याआधी २०२१ ला बांगला देशात झालेल्या बांगला देश इंटरनॅशनल चालेंज स्पर्धेत उपउपांत्य फेरीपर्यन्त मजल मारली होती. तर सन २०२० मध्ये आयोजित खेलो इंडिया स्पर्धेत आणि वारिष्ट गटाच्या अखिल भारतीय स्पर्धामध्ये स्मितने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला होता. तसेच स्मितने विविध गटाच्या १२ राष्ट्रीय स्पर्धामध्ये सुवर्ण. रौप्य आणि कास्य पदके मिळविली आहेत.

स्मितने नाशिकमध्ये अनेक वर्षे सराव करून राष्ट्रीय स्पर्धामध्ये आपले स्थान पक्के केले आहे.  सध्या ती हैद्राबाद येथे चेतन आनंद यांच्या बॅडमिंटन अकादमी मध्ये गेल्या दोन वर्षापासून नियमीत सराव करत आहे.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News